नवी दिल्ली : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत (Assembly Election Result) काँग्रेसची पुरती धूळधाण झाली. याचं खापर आता गांधी परिवारावर (Gandhi Family) फोडण्यात येतं आहे. कालपर्यंत दबक्या आवाजात चर्चा करणारे काँग्रेस नेते (Congress Leader) आता उघडपणे गांधी परिवाराच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2014 च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघातून हर्षवर्धन यांच्याकडून सिब्बल यांच्या पराभवाचा दाखला त्यांनी दिला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिब्बल यांनी 'इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत गांधी कुटुंबाने काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वापासून वेगळे व्हावे आणि दुसऱ्याला संधी द्यावी, असे म्हटले होते. मला 'घर की काँग्रेस' नको, तर 'सबकी काँग्रेस' हवी आहे, असेही ते म्हणाले होते.


मुलाखतीत त्यांनी म्हटले की, यावेळी निकालाने मला आश्चर्य वाटले नाही, कारण मी आधीच अंदाज लावला होता. 2014 पासून आम्ही सातत्याने खाली जात आहोत. एकामागोमाग एक राज्य आपण गमावले आहे. जिथे आम्ही यशस्वी झालो, तिथे आम्ही आमच्या कार्यकर्त्याला एकत्र ठेवू शकलो नाही. दरम्यान, काँग्रेसमधून काही दिग्गजांचे पलायन झाले आहे.


'ज्यांचा नेतृत्वावर विश्वास आहे ते काँग्रेसपासून दूर जात असल्याचे ते म्हणाले होते. 2022 च्या विधानसभा निवडणुकीतही नेतृत्वाच्या जवळच्या लोकांनी त्यांची साथ सोडली. मी आकडे बघत होतो. 2014 पासून सुमारे 177 खासदार, आमदार आणि 222 उमेदवारांनी काँग्रेस सोडली हे खरोखरच मनोरंजक आहे.'