नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कुठल्याही परिस्थिती संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं लोकसभेत काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खडगे यांनी म्हटंलय. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला राहुल गांधींना निमंत्रण देण्याचा संघाचा मानस आहे.


विचारससरणीची तुलना 


राहुल गांधींनी इंग्लंड दौऱ्यावर संघाच्या विचारसरणीची तुलना आखाती देशातली मुस्लिम ब्रदरहुडशी केलीय. यानंतर संघानं राहुल गांधींना विचारसरणी समजावी यासाठी संघाच्या बौद्धिकाला बोलवण्याचा निर्णय घेतलायं.