नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चिदंबरम सध्या आयएनएक्स मीडिया प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत आहेत.



आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी त्यांना अटक झाली आहे. पी चिदंबरम हे ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. चिदंबरम यांची आज दिवसभरात दुसऱ्यांदा प्रकृती बिघडली, त्यामुळे त्यांना दिवसभरात दुसऱ्यांदा एम्समध्ये न्यावे लागले आहे.