बंगळुरु : काँग्रेस नेते (Congress Leader) राहुल गांधी  (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांच्यावर टीका केलीय. सावकरांनी इंग्रजांकडून स्टायपेंड घेतला यासह अनेक आरोप राहुल गांधींनी केले. सध्या राहुल गांधी भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरु आहे. या यात्रेला 1 महिना पूर्ण झाला. राहुल गांधींनी या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली. यावेळेस त्यांनी ही घणाघाती टीका केली. (congress leader rahul gandhi agian critisize to swatantra veer savarkar over to various point at bengaluru)


राहुल गांधी काय म्हणाले?  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"सावरकर यांनी देश तोडला. सावरकरांनी इंग्रजांकडून स्टायपेंड घेतला", अशी टीका राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या तिरुवेकरे इथे पत्रकार परिषद घेतली. यावेळेस ते बोलत होते. तसेच "आरएसएसचा ब्रिटिशांना पाठिंबा होता, असा गंभीर आरोपही राहुल गांधी यांनी केला.


कर्नाटकातील वक्तव्यावरुन राज्यात राजकारण


दरम्यान राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरुन महाराष्ट्रात राजकारण तापलंय. राहुल गांधींच्या सावरकरांसंदर्भातल्या विधानावर उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. तर सावरकरांच्या राष्ट्रभक्तीबद्दल आदर असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले अंबादास दानवे यांनी दिली आहे.