मुंबई : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी २६ एप्रिलला कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान चार्टेड प्लेनने दिल्लीहून हुबली येथे जात होते. हे विमान क्रॅश होण्यापासून केवळ २० सेकंड दूर होत असा धक्कादायक खुलासा नुकताच झालायं. विमान हवेत हेलकावे घेणं आणि एमरजंसी लॅंडींग करण्याप्रकरणी नागरिक विमानन महानिदेशालय (DGCA) ने रिपोर्ट दिला आहे. 


राहुल यांची प्रतिक्रिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार,  राहुल यांच विमान क्रॅश होण्यापासून केवळ २० सेकंद वाचल अस स्पष्टीकरण यामध्ये दिलंय. मी आतून हललो होतो अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी यावेळी दिली होती. एनडीए सरकारने हा रिपोर्ट अजून सार्वजनिक केला नाहीए.


विमान क्रॅश हे कारस्थान ?


टेक्नीकल प्रोब्लेमवर पायलटने मात केली नसती तर २० सेकंदात गंभीर परिणाम झाले असते, एवढंच नव्हे तर विमान क्रॅशही झाल असतं असेही धक्कादायक वृत्त समोर येतंय.  त्यादिवशी राहुल यांच विमान एका बाजुला झुकल जात होतं आणि इंजिनमधून आवाज येत होता. हे एक कारस्थान असल्याचे कॉंग्रेसतर्फे सांगण्यात आले होते. कर्नाटक पोलिसांत यासंदर्भात तक्रार करण्यात आली होती.