नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भोजन समारंभासाठी काँग्रेसच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. २५ फेब्रुवारीला हा समारंभ होणार आहे. यात लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी आणि राज्यसभेतील काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रम्प यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कोणत्याच कार्यक्रमात आमंत्रित न केल्याबद्दल काँग्रेसनं टीका केली होती तसंच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी अहमदाबादमधल्या कार्यक्रमावर होणाऱ्या खर्चावरूनही सरकारवर टीका केली होती. तर ट्रम्प हे काही भगवान राम नव्हेत. ज्यांच्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च केला जातोय, अशी टीका काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली होती. 


दरम्यान दिल्लीतल्या मेलानिया ट्रम्प यांच्या शाळेतल्या भेटीदरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रण देण्यात आलेलं नाही त्यावरूनही सरकारवर टीका करण्यात येत आहे.