सूरत : गुजरातमध्ये भजन संध्या कार्यक्रमात नोटांची उधळण करणं म्हणजे काही नवं नाहीये. भजन कार्यक्रमात नोटांची उधळण झाल्याचे व्हिडिओ आजपर्यंत अनेकदा समोर आले आहेत. आता पुन्हा एकदा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे आणि त्याची जोरदार चर्चा होत आहे. याचं कारण म्हणजे या व्हिडिओत काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकोर या कार्यक्रमात नोटांची उधळण करताना दिसत आहे. हा व्हिडिओ राधनुपर येथे झालेल्या कार्यक्रमातील आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातचे आमदार अल्पेश ठाकोर हे ओबीसी समाजाचा प्रमुख चेहरा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अल्पेश ठाकोर खूपच चर्चेत होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पाटण येथील अल्पेश ठाकोर यांनी राधनपुर विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत. याच ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी पैशांची उधळण केली आहे.


व्हिडिओ पाहण्यासाठी https://drive.google.com/file/d/1KGbWvU1EB8OCwnQE8Faw2pNewtz77NhJ/view या लिंकवर क्लिक करा


या कार्यक्रमात अल्पेश ठाकोर, माजी खासदार जगदीश ठाकोर यांच्यासोबत इतरही नेते उपस्थित होते. हा कार्यक्रम रात्री उशीरापर्यंत सुरु होता. त्याच दरम्यान कार्यक्रमात नोटांचा पाऊस पडला.