रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : काँग्रेसच्या देशभरातील नेत्यांची बैठक दिल्लीत सुरू आहे. ३० नोव्हेंबरला भाजप विरोधात आंदोलन देशभर आंदोलन करण्याच्या मुद्द्यांवर इथे चर्चा सुरू आहे. तर महाराष्ट्र सत्ता स्थापनेवरही चर्चा नेत्यांमध्ये झाली. देशभरातील काँग्रेसचे प्रभारी, प्रदेशाध्यक्ष यांची बैठक झाली. राजीव सातव यांनी या संदर्भात माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याचं ठरलं आहे. सत्ता स्थापने संदर्भात कोणताही साशंकता नाही. येत्या काही दिवसातच सत्ता स्थापन संदर्भात माहिती दिली जाईल असेही ते म्हणाले. राफेल प्रकरण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल भाजपने वाचायला हवा. राफेल प्रकरणात भ्रष्टाचार झालाच असल्याचे ते यावेळी म्हणाले.



राज्यपालांच्या भेटीला 


शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आज दुपारी  साडे वाजता राज्यपालांची भेट घेणार आहेत. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, बंद असलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष आणि राज्यातल्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी या तिन्ही पक्षांचं शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहेत. राज्यातील प्रशासन अधिक गतिमान करण्यासाठी या भेटीत चर्चा करण्यात येणार आहे.