रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावर कोण राहणार? हा मुद्दा सकाळपासून चर्चेत होता. या संदर्भात काँग्रेस पक्षाच्या समितीची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत नेमकं काय झालं? कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली ते मुद्दे खालील प्रमाणे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. काँग्रेस समितीची बैठक संपल्यानंतर लवकरच काँग्रेसचे अधिवेशन बोलावण्यात येणार आहे.


२. जितीन प्रसाद यांनी बैठकीदरम्यान माफी मागितली आहे. 


३. आगामी २ महिन्यात काँग्रेसचे अधिवेशन होणार आहे. 


४. सोनिया गांधी या संघटनात्मक निर्णय घेतील, हा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 


५. सोनिया गांधी यांना मदत करण्याकरिता चार सदस्य पॅनल तयार करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. 


सोनिया गांधी पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून कायम राहणार-सूत्र


६. सोनिया गांधी पत्रावरून नाराज मात्र आता त्यांनी सर्वांना माफ केलं, असल्याचं सांगितलं. 


७.  पत्राच्या मुद्द्यावरून डॉक्टर मनमोहन सिंग यांनी म्हटलं, हे योग्य नाही.


८. कॅप्टन अमेन्द्रसिंग : ज्या नेत्यांसोबत आम्ही काम केलं त्यांनी असे पत्र पाठविणे अतिशय दुर्भाग्यपूर्ण.


९.  मुकुल वासनिक यांनी बोलताना सांगितले मी काही जे आहे ते सोनिया गांधींमुळे आहे.


१०. सोनिया गांधी काँग्रेस हे मोठे  कुटुंब आहे.


११.  भाजप विरुद्ध  एक मनाने लढण्याची तयारी करा.


१२. वर्किंग समितीची लवकर स्थापना करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. 


सोनिया गांधी सध्या पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून कायम राहणार आहेत. काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे, सीडब्ल्यूसीने या निर्णयाला सहमती दर्शविली आहे. काँग्रेस नेतृत्वाचा मुद्दा देशात चर्चेत होता. आज दिल्लीत काँग्रेस नेतृत्वाच्या प्रश्नावर खुली चर्चा झाली. या बैठकीदरम्यान पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं की, 'त्यांना पक्षाध्यक्षपदी पुढे रहायचे नाही. परंतु अनेक नेत्यांनी त्यांना पदावर कायम रहाण्याचे आवाहन केले आहे.