नवी दिल्ली : फूटबॉल वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये फ्रान्सनं क्रोएशियाचा पराभव करत २० वर्षानंतर पुन्हा वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. या मॅचमध्ये फ्रान्सनं क्रोएशियाचा ४-२नं पराभव केला. फ्रान्सच्या या विजयामध्ये पॉल पोगबाचा मोलाचा वाटा होता. फ्रान्ससाठी पोगबानं तिसरा गोल केला होता. याच पॉल पोगबाच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेसनं भाजपवर गोळीबार केलाय. पॉल पोगबाचा एक मीम व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. याच व्हिडिओचा आधार घेत काँग्रेसनं मोदींच्या अच्छे दिन वर निशाणा साधलाय.


मैदानात ड्रिंक्स ब्रेक सुरु असताना पॉल पोगबा औत्सुक्यानं इकडे-तिकडे बघत आहे. जेव्हा कोणी अच्छे दिन असं म्हणतं तेव्हा आमची अवस्थाही अशीच होते, असं म्हणतं काँग्रेसनं हा व्हिडिओ ट्विट केला आहे.