जयपूर : राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना पदावरुन हटवण्यात आलं आहे. त्यांच्यासोबत इतर दोन मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालहकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव काँग्रेस बैठकीत आज संमत झाला. पायलट यांना प्रदेशाध्यक्ष पदावरूनही काढण्यात आलं आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. विश्वेश्वर सिंग, रमेश मीना यांना ही मंत्रीपदावरून हटवण्यात आलं आहे. मंत्रिमंडळातील बदलाची माहिती राज्यपालांना देण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे राजभवनावर पोहोचले आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं की, 'भारतीय जनता पक्षाच्या षडयंत्राने राजस्थानच्या 8 कोटी जनतेच्या सन्मानाला आव्हान दिलं आहे. काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचं षडयंत्र होतं. धन आणि सत्तेचा उपयोग करुन काँग्रेस आणि अपक्ष आमदारांना आमिष दिलं गेलं.'



रणदीप सुरजेवाला यांनी आरोप केला की, सचिन पायलट भ्रमित होऊन भाजपच्या जाळ्यात फसले आणि काँग्रेस सरकार पाडण्याच्या मागे लागले. मागील 72 तासात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी प्रत्येक गोष्टीला नकार दिला.'