नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन झाल्यावर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली. पण, काँग्रेसने वाहिलेल्या या श्रद्धांजलीवर युजर्स भलतेच संतापले. इतके की, प्रचंड टीका पाहून काँग्रेसला आपल्या ट्विटर हॅंडलवरून हे ट्विट काढून टाकावे लागले


काँग्रेसने ट्विटमध्ये काय म्हटले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, 'श्रीदेवींचे निधन झाल्याची बातमी कळल्यावर आम्हाला प्रचंड दु:ख झाले. त्या एक गुणी अभिनेत्री होत्या. आपला अभिनय आणि उत्कृष्ट काम यामुळे त्या आमच्या हृदयात सदैव राहतील. त्यांचे कुटुंबिय आणि आप्तेष्ठांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. श्रीदेवी यांना यूपीए सरकारच्या काळात २०१३मध्ये 'पद्मश्री' पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले होते'.



का संतापले युजर्स?


दरम्यान, काँग्रेसने केलेल्या टविटमधील 'श्रीदेवी यांना यूपीए सरकारच्या काळात २०१३मध्ये 'पद्मश्री' पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले होते', या वाक्यावर युजर्स चांगलेच संतापले. किमान श्रद्धांजलीसारख्या वेळी तरी काँग्रेसने किमान राजकारण मध्ये आणून नये. काँग्रेसचे हे वर्तन म्हणजे अत्यंत संतापजनक असल्याचीह भावाना काही युजर्सनी व्यक्त केली. तर, काँग्रेसकडे आता आत्मसन्मानही उरला नसल्याची भावनाही काही युजर्सनी प्रतिक्रियेच्या माध्यमातून व्यक्त केली.