वॉशिंग्टन : कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेरिका दौऱ्यास सोमवारपासून  (११ सप्टेंबर) सुरूवात झाली. दोन आठवड्यांच्या या दौऱ्यात राहुल गांधी जागतिक विचारवंत आणि नेत्यांशी चर्चा करतील. तसेच, कॅलिफोर्निया विद्यापीठात विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅलिफोर्निया विद्यापीठात राहुल गांधी 'इंडिया अॅट ७०: रिफलेक्शन ऑन द पाथ फॉरवर्ड' या विषयावर भाषण करतील. या भाषणाच्या माध्यमातून राहुल गांधी समकालीन भारत आणि त्याच्यापुढच्या वाटचालीवर भाष्य करतील. या कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी विद्यापीठाने जाहीर केले आहे की, या कार्यक्रमासाठी सुरू असलेली नोंदणी बंद करण्यात आली आहे. कारण, उपलब्ध असलेल्या सर्व जागांची नोंदणी संपलेली आहे. त्यामुळे आता सिट्सच शिल्लख नाहीत.


ज्येष्ठ कॉ़ंग्रेस नेते सॅम पित्रोदा आणि इंडियन नॅशनल ओवरसीज कॉंग्रेसचे (इनोक) अमेरिकेतील अध्यक्ष शुद्ध सिंह यांनी सॅन फ्रान्सिस्को येथे राहुल यांचे स्वागत केले.