काँग्रेसचा विजय हा कार्यकर्ते, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा आहे - राहुल गांधी
मोदी सरकारने चार वर्षात काहीही केलेले नाही. काँग्रेसचा विजय हा कार्यकर्ते, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली.
नवी दिल्ली : मोदी सरकारने चार वर्षात काहीही केलेले नाही. अशात आम्ही लोकांना चांगला पर्याय वाटलो म्हणून आम्हाला त्यांनी निवडून दिले आहे. ही परिवर्तनाची सुरुवात आहे. आजचा पराभव हा भाजपसाठी आणि पंतप्रधानांसाठी एक संदेश आहे. काँग्रेसचा विजय हा कार्यकर्ते, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली. त्याचवेळी या विजयाचे श्रेय त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिले. काँग्रेस कार्यकर्ते हे बब्बर आहेत, असे सांगत कौतुक केले.
शेतकरी प्रश्नावर राहुल गांधी म्हणालेत, आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडण्यावर भर देणार आहोत. त्यांना कायमस्वरुपी कर्जमाफी देणे हे हा उपाय नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविलेले नाही. मोदी यांनी रोजगार निर्मतीचे आश्वासन दिले होते. भ्रष्टाचाराविरोधात लढाई लढू, असेही आश्वासन दिले होते. तसेच ते शेतकऱ्यांचीही काळजी घेतील असे वाटले होते, मात्र मोदी यांनी दिलेले एकही आश्वासन पाळले नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. ही परिवर्तनाची सुरुवात आहे. यापुढेही भाजपच्या विचार सरणीला आमचा विरोध राहिले, असे ते म्हणालेत.
भाजपची एक विचार धारा आहे. या विचारधारेविरुद्ध आम्ही लढणार आणि लढत राहू. आज त्यांच्याविरोधात आम्ही जिंकलो आहे. आम्ही कोणाला भारत मुक्त करणार नाही. ते भारतात राहतील. असा मोदींना चिमटा काढला. मोदींनी काँग्रेस मुक्त भारत, अशी घोषणा केली होती. त्यावर सूचक वक्तव्य राहुल यांनी केले. त्याचवेळी भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा त्यांनी मांडला. राफेल करारात भ्रष्टाचार झाला आहे आणि त्याचे सत्य लवकरच बाहेर येईल असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
इतक्या वर्षात मोदी सरकारने काहीही केलेले नाही अशात आम्ही त्यांना चांगला पर्याय वाटलो म्हणून आम्हाला लोकांनी निवडून दिले आहे. आजचा पराभव हा भाजपासाठी आणि पंतप्रधानांसाठी एक संदेश आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
मध्य प्रदेशात काँग्रेस सत्ता स्थापन करेल. सत्ता स्थापनेसाठी काहीही अडचण येणार नाही. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टी ही आमच्याच विचारांची आहे. त्यामुळे निवडणुकांच्या आधीही आम्ही त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बोलणी यशस्वी झाली नाहीत. आता ते भाजपसोबत जाणार नाहीत तर आमच्यासोबत येतील, असा आम्हाला विश्वास आहे, राहुल यांनी स्पष्ट आहे.