Rahul Gandhi Notice : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस, 15 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याची मुदत
Political news : लोकसभा सचिवालयान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नोटीस पाठवली आहे.. विशेषाधिकार भंग प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
Rahul Gandhi News : लोकसभा सचिवालयान काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नोटीस पाठवली आहे. (Political News) विशेषाधिकार भंग प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. 7 फेब्रुवारीला लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेवदरम्यान राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर आरोप केले होते. मोदींविरोधात खोटी, अवमानकारक, असंसदीय आणि दिशाभूल करणारी तथ्ये ठेवल्याचा आरोप राहुल गांधी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. राहुल गांधी यांना या नोटीसवर बुधवार म्हणजेच 15 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.
राहुल गांधी यांच्याविरोधात विशेषाधिकार भंग नोटीस बजविण्यात आली आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे आणि संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलेल्या विशेषाधिकार भंग केल्याच्या नोटीसवर लोकसभा सचिवालयानं उत्तर मागितले आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेत राष्ट्रपती यांच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर बोलताना उद्योजक गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात प्रश्न विचारत आरोप केले होते. त्यानंतर भाजपकडून राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात आली होती.
राहुल गांधी यांनी मोदींबद्दल चुकीचे, अवमानकारक, असंसदीय आणि दिशाभूल करणारे मुद्दे मांडल्याचा दावा भाजपच्या खासदारांकडून करण्यात आला आहे. त्यासंदर्भात भाजप खासदारांनी ही नोटीस दिली आहे. आता लोकसभा सचिवालयाच्या विशेषाधिकार आणि वर्तणूक शाखेच्या उपसचिवानी राहुल गांधी यांना ईमेलवर नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आता राहुल गांधी काय उत्तर देतात याची उत्सुकता आहे.
राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने गौतम अदानी यांच्यासंदर्भात जारी केलेल्या अहवालावरुन सवाल उपस्थित केले होते. पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्या संबंधांवर प्रश्नचिन्ह देखील राहुल गांधी यांनी उपस्थित केले होते. यावेळी लोकसभेत भाजप खासदारांनी पुरावा द्या, अशी मागणी केली होती. त्यावेळी राहुल यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला होता.