Cooking Tips: 10 मिनिटात पनीर पासून बनवा हलवाई स्टाईल कलाकंद ..सोपी रेसिपी जाणून घ्या
Cooking Tips: बाजारात मिळते तशीच हलवाई बनवतो अगदी त्याच चवीची कलाकंद बर्फी बनून तयार तेही घरच्या घरी आणि कुठलेलंही प्रिजर्व्हेटिव्ह न वापरता. चला तर मग तुम्हीसुद्धा आजच ही खास रेसिपी ट्राय करा आणि घरच्यांना खाऊ घाला सगळे तुमचं कौतुक करतील हे मात्र नक्की.
Easy Recipe : तोंडात टाकताच विरघळतो, बराच वेळ जिभेवर ज्याची चव रेंगाळत राहते, बऱ्याच जणांची आवडती मिठाई म्हणजे कलाकंद. (kalkand mithai) मिठाईच्या दुकानात गेल्यावर प्लेटमध्ये पसरवलेला पांढराशुभ्र बर्फीचा थर, त्यावर भुरभुरलेले ड्रायफ्रुटस व्हा ! ही मिठाई नुसती पहिली तरी तोंडाला पाणी सुटतं.. पण शेवटी बाहेरच खाणं म्हणजे त्यात किती खरेपणा असेल सांगता येत नाही (fake mithai in market) कारण बाजारात मिळणाऱ्या मिठायांमध्ये सर्रास भेसळ केली जाते अश्या अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेतच, आणि घरी करायचं म्हणजे आपल्याला ती मिठाई (kalakand sweet) साधेलच असं नाही ना. पण आता यावरसुद्धा आपल्याकडे भन्नाट आयडिया आहे. झटपट आणि चक्क पनीरपासून कलाकंद बनवण्याची सोपी रेसिपी (easy quick recipe) आज जाणून घेऊया. (cooking tips for making kalkand barfi at home halwai style easy quick recipe in marathi )
आणखी वाचा: Kitchen Tips: उरलेल्या चपात्यांपासून 5 मिनिटात बनवा हटके डिश...लहान मुलांना खूप आवडतील 'हे' रोटी बॉल्स
साहित्य
दूध पावडर
कंडेन्सड मिल्क
पनीर
वेलची पूड
पिस्त्याचे काप
कृती
पनीरपासून कलाकंद बनवायचा असेल तर सर्वात आधी एक नॉनस्टिक भांड घ्या. त्यात दूध पावडर घाला त्यात कंडेन्सड मिल्क (condensed milk) घाला आणि चांगलं ढवळून घ्या, मिश्रण चांगलं एकजीव झाल्यावर त्यात पनीर हाताने कुस्करून घाला (cooking tips) आणि चांगलं एकजीव होईपर्यंत ढवळत राहा. (kitchen hacks) साधारण 3-4 मिनिट ढवळल्यावर तुम्हाला मिश्रण हलकं सोनेरी रंगाचं दिसेल मग गॅस बंद करून घ्या. आता हे गरम मिश्रण एका पसरत भांड्यात ओतून घ्या चमच्याच्या साहाय्याने सर्व बाजूनी व्यवस्थित पसरवा.
आणखी वाचा: Cooking Tips : वाटीभर तांदूळ वापरून बनवा मऊ आणि जाळीदार डोसे...तेही इन्स्टंट आणि स्वादिष्ट...ही घ्या रेसिपी
यावर आता पिस्त्याचे काप पसरा थोडा वेळ हे मिश्रण सेट होऊद्या. आणि मग आवडीप्रमाणे त्याचे काप करा आणि बर्फी (कलाकंद मिठाई रेसिपी) सर्व्ह करा . बाजारात मिळते तशीच हलवाई बनवतो अगदी त्याच चवीची कलाकंद बर्फी बनून तयार तेही घरच्या घरी आणि कुठलेलंही प्रिजर्व्हेटिव्ह न वापरता. चला तर मग तुम्हीसुद्धा आजच ही खास रेसिपी ट्राय करा आणि घरच्यांना खाऊ घाला सगळे तुमचं कौतुक करतील हे मात्र नक्की. (cooking tips for making kalkand barfi at home halwai style easy quick recipe in marathi )