cooking tips to make papad crispy: पापड खायला कोणाला आवडत नाही असे क्वचितच असतील . कुर्रर्रर्रम.. कुर्रर्रर्रम करत पापड खाणं हे प्रत्येकालाच आवडत लहान असो व मोठी मानस पापड आवडतोच. बाहेर हॉटेल मध्ये जेवायला गेल्यावर स्टार्टर म्हणून पापड खाणं  हे अगत्याचं होऊन गेलय. पापडांमध्ये खूप प्रकार असतात मग मसाला पापड असतो रोस्टेड पापड फ्राईड पापड असे अनेक प्रकार आहेत. (masala papad)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरी बऱ्याचदा आपण पापड भाजतो पण जरा जरी हवा लागली कि पापड लगेच मऊ होऊन जातात..मऊ झालेले पापड कागदासारखे लागतात खाताना ते अगदीच बेचव लागू लागतात.


त्यांची काहीच चव लागत नाही. आणि मग असे मऊ पडलेले पापड बऱ्याचदा फेकले जातात. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं कि अश्या प्रकारे हवेने मऊ झालेला पापड काहीच मिनिटात पुन्हा क्रिस्पी होऊ शकतो.


तो फेकून देण्याची काहीच गरज नाहीये.. तर कदाचित तुम्हाला खरं वाटणार नाही पण हे खरं आहे चला तर मग जाणून घेऊया असेच काही भन्नाट किचन आणि कुकिंग टिप्स (cooking tips how to keep papad crispy for long time hacks)


मायक्रोवेव्ह करेल कमाल (microwave)


मऊ झालेला पापड पुन्हा कुरकुरीत करायचा असेल तर पापड बेकिंग ट्रे मध्ये ठेवा, मायक्रोवेव्ह 110 डिग्रीवर 30 सेकंदांसाठी सेट करा आणि पापड बाहेर काढा, तेव्हा कदाचित पापड मऊ च लागेल पण जसजसा तो थंड होतो पापड कुरकुरीत होऊ लागेल. 


तव्यावर पुन्हा शेका (hot pan)


 तवा मंद आचेवर गरम करून घ्या, लक्षात ठेवा ताव जास्त तापवायचा नाहीये. आता मऊ झालेला पापड तव्यावर चांगला शेकून घ्या मऊ पडलेला पापड पुन्हा एकदा क्रिस्पी होईल.  (cooking tips how to keep papad crispy for long time hacks )


 डीप फ्राय करा (deep fry)


 वरील दोन्ही पद्धती वापरायच्या नसतील तर हा एक अतिशय सोपा आणि वेळ न जाणारा उपाय तुम्ही करू शकता.. कढईत तेल गरम करा तेल चांगलं कडकडीत तापलं कि मग यात हे मऊ झालेले पापड पुन्हा एकदा डीप फ्राय करून घ्या. पापड पुन्हा


एकदा क्रिस्पी होतील.. (crispy papad)


चला तर मग हे सोपे कूकिंग टिप्स वापरा आणि यापुढे मऊ पडलेले पापड फेकून न देता पुन्हा क्रिस्पी बनवा आणि मजा घ्या..