मुंबई : कुन्नूर दुर्घटनेने संपर्ण देशाला हादरवून टाकलं. या भयावह हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाचे पहिली CDS जनरल बिपिन रावत यांच्यासह 13 जणांचं निधन झालं. हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 लोकं होते. ज्यामधील ग्रुप कॅप्टन वरूण सिंहच या दुर्घटनेत बचावले आहेत. कॅप्टन सिंह सध्या रूग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दरम्यान त्यांची एक चिठ्ठी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


विद्यार्थी आणि मुख्याध्यापकांना लिहिली चिठ्ठी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेलिकॉप्टर दुर्घटनेतील एकमेव बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांनी 18 सप्टेंबर 2021 रोजी त्यांच्या शाळेला एक पत्र लिहिले. जे आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यांनी हे पत्र आर्मी पब्लिक स्कूल, चंडी मंदिरच्या मुख्याध्यापकांना लिहिले. जिथे कॅप्टन सिंह यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. या पत्रात त्यांनी त्यांच्या शाळेतील अभ्यासात सरासरी असलेल्या मुलांना संबोधित केले आहे.


90% मिळाले नाही तर काहीच हरकत नाही 


शौर्यचक्र पुरस्कार विजेते ग्रुप कॅप्टन वरुण सिंह या पत्रात लिहितात, 'अभ्यासात कमी असणे ठीक आहे. प्रत्येकजण शाळेत उत्कृष्ट होऊ शकत नाही आणि प्रत्येकजण 90% गुण मिळवू शकत नाही. हे यश मिळाले तर ती चांगली गोष्ट आहे. त्याचे कौतुकही व्हायला हवे. पण असे झाले नाही तरी तुम्ही मध्यम आहात असे समजू नका. कारण शाळेत मध्यम असणे म्हणजे आयुष्यात येणाऱ्या गोष्टींना सामोरे जाण्याचे मोजमाप नाही.



पुढे वरूण सिंह लिहितात की, यासोबत आपली आवड शोधा. कला, संगीत, ग्राफिक डिझाइन, साहित्य याव्यतिरिक्त काहीही असू शकते. बस तुम्ही जे देखील काम कराल. त्याला स्वतःचे 100 टक्के द्या. यामध्ये प्रयत्न करताना तुम्हाला फार कष्ट होणार नाही. कारण ती तुची आवडच असेल.