नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग (Cornavirus in India)झपाट्याने वाढत आहेत. दरम्यान, भारतातील कोरोना केसेसनी सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. गेल्या 24 तासांत 3.54 लाखाहून अधिक नव्या केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. कोरोना सुरु झाल्यापासून ही आतापर्यंतची सर्वाधिक नोंद आहे.


24 तासांत 3.54 नव्या केसेस आणि 2806 मृत्यू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्डमीटरने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 3 लाख 54 हजार 531 लोकांना भारतात कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर या काळात 2806 लोक मरण पावले. यानंतर, भारतात कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या 1 कोटी 73 लाख 4 हजार 308 वर गेली आहे. तर 1 लाख 95 हजार 116 लोकांचा मृत्यू गेला आहे. 



आतापर्यंत देशभरात 1 कोटी 42 लाख 96 हजार 640 लोक बरे झाले आहेत.  देशभरात 28 लाख 7 हजार 333 लोकांवर उपचार सुरू आहेत, जे संक्रमित लोकांच्या एकूण संख्येच्या 16.2 टक्के आहेत.


महाराष्ट्रात 24 तासांत 773 जणांनी आपला जीव गमावला आहे. लॉकडाऊन आणि कडक निर्बंध असूनही कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत, 66 हजार 836 नवीन रुग्णांची नोंद झाली. यात संक्रमित झालेल्यांची संख्या 41,61,676 वर पोहोचली आहे. आणखी 773 लोकांच्या मृत्यूनंतर ही संख्या 63 हजार 252 वर पोहोचली आहे. कोरोनाचा पराभव करून आतापर्यंत 34,04,792 लोक बरे झाले आहेत.


कोरोना विषाणूची दुसरी लाट देशासाठी संकट बनली आहे. मोठ्या संख्येने कोरोना संसर्गाच्या घटनांमुळे रुग्ण बेडसाठी संघर्ष करत आहेत. तर औषधांचीही कमतरता जाणवत आहे. ऑक्सिजनच्या अभावामुळे रुग्णांचे प्राण धोक्यात आहेत. परिस्थिती अशी आहे की गेल्या 24 तासांत देशात दर मिनिटाला 243 नवीन रुग्णांची वाढ होत आहे.


भारतात गेल्या 24 तासात


प्रति मिनिटाला 243 लोकांना संसर्ग
सरासरी दर मिनिटाला 1.9 मृत्यू
प्रति मिनिटाला 1,194 लोकांची चाचणी
तीन दिवसांत 10 लाखाहून अधिक रुग्ण


गेल्या तीन दिवसांत देशात कोरोना संसर्गाची प्रकरणं 10 लाखांवर गेली आहेत. काही महिन्यांपूर्वी 10 लाख रुग्ण वाढण्यासाठी 65 दिवसांचा कालावधी लागला हता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोरोनाची पहिली लाट आली असतानाही, दहा लाखांचा आकडा गाठण्यासाठी 11 दिवस लागले होते.