Coromandel Train Accident Latest Update : शुक्रवारी रात्री ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात मृतांचा आकडा 233 च्याही पलीकडे गेला आहे. या अपघातात आत्तापर्यंत 900 हून अधिकजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सध्याच्या घडीला जखमींवर वेगवेगळ्या ठिकाणी रुग्णालयं आणि प्रथमोपचार केंद्रांमध्ये उपचार सुरू आहेत. हा रेल्वे अपघात इतका भयंकर होता की त्याचे थेट परिणाम भारतीय रेल्वेच्या वेळापत्रकावर झाले असून, रेल्वेचं वेळापत्रकच कोलमडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओडिशा येथे झालेल्या रेल्वे अपघाताचा थेट परिणाम वंदे भारत एक्स्प्रेसवरही झाला असून, 3 जून 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या वंदे भारत ट्रेनचा लोकार्पण सोहळाही रद्द करण्यात आला आहे. ओडिशा रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. मडगाव ते सीएसएमटी या मार्गावर ही रेल्वे धावणं अपेक्षित होतं. 


दरम्यान, ओडिशामध्ये झालेला अपघात पाहता कोरोमंडल रेल्वे रुळाचं एकूण नुकसान पाहता 3 जून 2023 या दिवसासाठी या मार्गावरून जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही रेल्वेंचे मार्ग वळवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. त्यामुळं तुम्हीही यादरम्यानच्या काळात लांब पल्ल्याच्या रेल्वेनं प्रवास करणार असाल, तर आताच हे नवे बदल पाहून घ्या. 


कोणत्या रेल्वे गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले? 


- ट्रेन नंबर- 18409 जमशेदपूरच्या दिशेनं वळवण्यात आली. 
- ट्रेन नंबर 15929 पुन्हा भदरक येथे बोलवण्यात आली. 
- चेन्नई सेंट्रल-हावडा एक्सप्रेस (ट्रेन नंबर 12840) खडगपूर मंडलला वाया जारोली मार्गे जाईल. 
- वास्को दी गामा - शालीमार एक्सप्रेस ( ट्रेन नंबर 18048) कटक, सालगाव आणि अंगुल वाटे वळवण्यात आली आहे. 
- सिकंदराबाद-शालीमार साप्ताहिक ट्रेन ( ट्रेन नंबर 22850) चा मार्ग बदलून तो कटक, सालगाव आणि अंगुल वाटे वळवण्यात आला आहे. 


हेसुद्धा वाचा : Coromandel Train Accident : कोरोमंडल रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा 233 वर


- ट्रेन नंबर- 22807 वाया टाटा जमशेदपूर पुढे जाईल. 
- ट्रेन नंबर- 22873 टाटा जमशेदपूरहून पुढे जाईल. 
- ट्रेन नंबर- 22817 टाटा जमशेदपूरहून पुढचा प्रवास करेल. 
- ट्रेन नंबर- 18409 जमशेदपूरच्या दिशेनं वळवण्यात आली आहे. 


कोणत्या रेल्वेगाड्यांवर अपघाताचा परिणाम? 


भारतीय रेल्वे विभागानं दिलेल्या माहितीनुसार बऱ्याच रेल्वेगाड्या पुढील सुचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये ट्रेन नंबर- 12839 हावडा-चेन्नई सेंट्रल मेल, 12895, 20831, हावड़ा पुरी सुपर फास्ट एक्सप्रेस ट्रेन नंबर 12837 आणि 02837 रद्द करण्यात आल्या आहेत. हावडा-एसएमवी बँगलोर एक्सप्रेस ट्रेन नंबर 12863 सुद्धा या अपघातानंतर रद्द करण्यात आली आहे. 


सदरील अपघाताचं गांभीर्य आणि त्याचे परिणाम पाहता पश्चिम बंगाल रेल्वे विभागानं नियंत्रण कक्षही सुरु केलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दु:ख व्यक्त करत कोलकाता येथे नियंत्रण कक्ष सुरु करण्याची घोषणा केली. कोलकाता येथील आपात्कालीन नियंत्रण कक्षासाठी 033- 22143526 / 22535185 हे दूरध्वनी क्रमांक सक्रिय करण्यात आले असून, यावर संपर्क साधून अपघातग्रस्तांबाबतची माहिती त्यांचे नातेवाईक मिळवू शकतात.