मुंबई : देशात कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ सुरुच आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यात गेल्या 24 तासात 56,383 लोकांनी  कोरोनावर मात केली आहे. आकडेवारीनुसार, देशात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट आता 70 टक्क्यांहून अधिक झाला आहे. यासह देशभरात एकाच दिवसात सर्वाधिक 7 लाख 33 हजार 449 कोरोना टेस्ट करण्यात आल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील कोरोनामुळे मृतांची संख्या 47 हजारांच्या पुढे गेली आहे. तर जवळपास 24 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.


गुरुवारी सकाळी जाहीर झालेली आकडेवारी


गेल्या 24 तासात कोरोनामुळे 942 रुग्णांचा मृत्यू
गेल्या 24 तासात 66,999 लोकांना कोरोनाची लागण
एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 23,96,637
एकूण मृत्यू 47,033
एकूण उपचार घेत असलेले रुग्ण 6,53,622
बरे झालेल्या रुग्णांची संख्या 16,95,982


बुधवारी मुंबईत 1,132 नवीन रुग्णांची वाढ झाली. तर 50 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत सुमारे 7000 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर मात करुन बरे झालेल्या लोकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी मुंबईतील तीन रुग्णालयात 'पोस्ट कोविड ओपीडी' सुरू करण्यात आली आहे.


आयुष मंत्रालयाचे मंत्री श्रीपाद नाईक यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. ट्विटरवर त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. पण त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत, त्यामुळे ते घरीच उपचार घेत आहेत. याआधी गृहमंत्री अमित शाह तसेच मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अर्जुन मेघवाल यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.