रांची : झारखंड राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सरकारने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. येथे लॉकडाऊनच्या नियमांचे पालन पूर्वीसारखेच काटेकोरपणे चालू राहील, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. याआधी लॉकडाऊन कालावधी फक्त ३० जूनचा होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारने शुक्रवारी एक अधिसूचना जारी केली आणि म्हटले आहे की, उच्चस्तरीय बैठकीनंतर कोविद -१९ रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन राज्यस्तरीय कार्यकारी समितीचे अध्यक्ष आणि झारखंडचे मुख्य सचिव सुखदेव सिंह यांनी आज हे निर्देश जारी केले.



पूर्वीच्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था, चित्रपटगृहे, मॉल्स, सलून, स्पा, हॉटेल, रेस्टॉरंट्स, धर्मशाळा, बार, आंतरराज्यीय बससेवा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, जिम, कोचिंग यासह मंदिर, मशिदी, चर्च यांचा समावेश आहे. संस्था बंदच राहतील आणि लॉकडाऊनच्या नियमांचे पालन काटेकोरपणे सुरु राहील, असे जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे.