अहमदाबाद : गुजरातच्या (Gujarat) अहमदाबादमध्ये (Ahmedabad) कोरोनाव्हायरसच्या  (Coronavirus) झपाट्याने वाढत असलेल्या घटना लक्षात घेता राज्य सरकारने आज (२० नोव्हेंबर) रात्रीपासून ५७ तासांचा कर्फ्यू  (Night Curfew) लावण्याचा निर्णय घेतला आहे. आज रात्री ९ वाजल्यापासून कर्फ्यू (Curfew) सुरू होईल आणि सोमवारी सकाळी ६ पर्यंत सुरू राहतील. यानंतर कोरोना नियंत्रित होईपर्यंत मंगळवारपासून सकाळी ९ ते सकाळी ६ या वेळेत नाईट कर्फ्यू असणार आहे. या निर्णयानंतर आज बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली. त्यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दुकानासमोर प्रचंड रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे.


पूर्ण लॉकडाऊनच्या भीतीने दुकानासमोर रांगा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्फ्यूबाबत लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि यामुळे अहमदाबादमध्ये सकाळपासूनच दुकानांमध्ये खरेदीसाठी लांबलचक रांगा दिसून आल्या आहेत. लोकांना वाटत आहे की, परिस्थिती नियंत्रित न केल्यास कर्फ्यूमध्ये आणखी वाढ केली जाऊ शकते. त्यामुळे जीवनाश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली आहे. कर्फ्यूच्या वेळी केवळ दूध आणि औषधे विकणारी दुकाने खुली राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


अहमदाबादमध्ये AMTS बस सेवा बंद


५७ तासांचा कर्फ्यू सुरू होण्यापूर्वी अहमदाबादमधील अहमदाबाद नगरपालिका परिवहन सेवा (AMTS) ने बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एएमटीएस बससेवा आज रात्री ९.०० ते सोमवार पर्यंत बंद राहील.


मास्क नसल्यास १००० रुपयांचा दंड


अहमदाबाद महानगरपालिकेने मास्क नसेल त्यांच्याकडून १००० रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मास्क नसलेल्यांची तात्काळ कोरोना चाचणी देखील केली जाईल आणि जे लोक पॉझिटिव्ह असतील त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. यासाठी पालिका कर्मचारी सातत्याने पाळत ठेवतील.


संपूर्ण गुजरातमध्ये लॉकडाऊनची अफवा



अंबाजीचे दर्शन घेण्यासाठी गेलेले गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले की, शाळा सुरू करण्याचा निर्णय आगामी बैठकीत घेण्यात येईल. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. अहमदाबादमध्ये कर्फ्यू घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी असे म्हटलं आहे की, गुजरातमध्ये लॉकडाऊन अफवा पसरवल्या आहेत. तसेच जे मास्कचा वापर करणार नाहीत, त्यांच्यावर पोलीस कारवाई केली जाईल.


१६०० विवाह रखडले


कर्फ्यूमुळे अहमदाबादमध्ये दोन दिवसात १६०० विवाहसोहळे रखडले आहेत. सरकारच्या कर्फ्यूच्या निर्णयानंतर कार्यक्रमांचे आयोजक आणि विवाहसोहळा घेणारी कुटुंबे दोघेही नाराज दिसत आहेत. सरकारकडून विवाह सोहळ्यांना परवानगी न मिळण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयावर कार्यक्रम आयोजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या लग्नासाठी आगाऊ भाडे इव्हेंट मॅनेजमेंटने घेतले आहेत. आता ते रद्द झाल्यामुळे आयोजकांना लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते.