नवी दिल्ली : सतत वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे देशात सर्वत्र भीतीचे वातावरण होते. आता मात्र अनेक महिन्यांनंतर करोनाविरोधातील लढाईदरम्यान आशेचा किरण दिसू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मात्र नागरिकांनी अद्यापही नियमांचे पालन करणे गरजे आहे. प्रत्येकाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. गेल्या २४ तासात देशात ३६ हजार ६०४ नवे रुग्ण आढळले असून हा आकडा गेल्या तीन महिन्यांमधील सर्वात कमी आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी देशात कोरोनामुळे ४९० रुग्णांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत भारतात  १ लाख १९ हजार ४९६ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या ७९ लाख ४६ हजार ६५२ वर पोहोचली आहे. 


त्याचप्रमाणे दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोना रूग्ण वाढत्या संख्येच्या तुलनेत कोरोना व्हायरसवर मात करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. देशात सध्या ६ लाख ३० हजार ५४६ रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत ७२ लाख १ हजार ७० रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला आहे.