नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून भारतातही हे संकट घोंघावतंय. यासाठी सरकारतर्फे नागरिकांसाठी निर्देश जारी करण्यात आले आहेत. नागरिकांनी सतर्कता बाळगून गर्दीची ठिकाणं टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पण आग्रा येथे धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे सर्वांची भांबेरी उडाली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आग्रा येथील एक युवती इटलीतून आपल्या पतीसोबत हानीमून करुन बंगळूरमध्ये परतली होती. बंगळूर येथे तिला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. आपल्यासोबच्या इतरांची पर्वा न करता ही युवती तिथून पळून गेली. ८ मार्चला बंगळूर येथून फ्लाईट पकडल्यानंतर ती दिल्ली आणि तिथून ट्रेन पकडून आपल्या माहेरी गेली. आरोग्य विभागाला ही माहिती कळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्या युवतीची शोधाशोध सुरु झाली. 



या महिलेसहित तिच्या परिवारातील ८ जण राहत्या घरी आयसोलेशनमध्ये होते. तिची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. आता आरोग्य विभागातर्फे त्या महिलेच्या मार्गात आलेल्या सर्वांची तपासणी सुरु आहे. फ्लाईटमध्ये तिच्यासोबत असलेल्या प्रवाशांची देखील तपासणी केली जात आहे. 


महिेलेच्या या निष्काळजीपणासोबतच बंगळूर आणि दिल्ली विमानतळ प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सध्या विमानतळावर सर्वांची स्क्रिनींग सुरु आहे. यातून ती महिला बाहेर कशी पडली ? तिची तपासणी का झाली नाही ? तिच्यातील कोरोना व्हायरस ओळखता कसा आला नाही ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.