नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या प्रवासी मजूर आणि शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. प्रवासी मजुरांना पुढचे २ महिने मोफत धान्य दिलं जाणार आहे. रेशन कार्ड नसणाऱ्यांसाठी प्रत्येक व्यक्तीला ५ किलो गहू किंवा तांदूळ आणि प्रत्येक कुटुंबाला १ किलो चणाडाळ देण्यात येईल. याचा ८ कोटी मजूरांना फायदा होईल, तसंच यासाठी ३,५०० कोटी रुपये देत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वन नेशन वन रेशनकार्ड ही सुविधा ऑगस्ट २०२० पर्यंत सुरू करणार. याचा ६७ कोटी लाभधारकांना याचा फायदा होईल. वन नेशन वन रेशनकार्डच्या माध्यमातून नागरिकांना देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातल्या रेशन दुकानात धान्य मिळेल.


याशिवाय केंद्र सरकारने रस्त्यावरच्या फेरीवाल्यांसाठी ५ हजार कोटी रुपयांच्या पत सुविधेचीही घोषणा केली आहे. प्रवासी मजूर आणि शहरातल्या गरिबांसाठी घरभाडं कमी दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.



मजुरांसाठीच्या घोषणा 


- शहरी गरीब लोकांना ११ हजार कोटीची मदत केली. खाण्या-पिण्याची सोय केली.


- राज्यांना आपत्कालीन निधी वापरण्यास परवानगी दिली.


- मनरेगाच्या माध्यमातून स्थलांतरीत कामगारांना काम उपलब्ध करून दिलं जातंय.


- त्यांच्याच राज्यात हाताला काम देण्याची सोय केलीय.


- मनरेगासाठी १० हजार कोटी रूपये खर्च केले आहे. आणखी गरज असेल तर केले जाईल.


- ४०-५० लाख लोकांनी नोंदणी केलीय.


- ४० टक्के लोकांचे प्रमाण वाढले आहे.


- मजूरांसाठी कायदा केला जाईल.


- मिनिमम वेजेस प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहे, ते संपुष्टात आणले जाईल


- मजूरांची दरवर्षी आरोग्य तपासणी केली जाईल


- १० कामगार असलेल्या कंपनीला ईएसआय सुविधा लागू होईल.


- मुद्रा लोन शिशू श्रेणीमध्ये असलेल्यांसाठी १,५०० कोटी रुपये, व्याजात २ टक्के दिलासा. या योजनेअंतर्गत १ लाख ६२ कोटी रुपये दिले. ३ कोटी लोकांना १५०० कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. 


शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा, ३१ मेपर्यंत व्याजात सूट, ४ लाख कोटींचं कमव्याजी कर्ज