Covid 19 BA-2 variant : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने (​corona new variant) आशिया आणि युरोपातील अनेक देशांमध्ये कहर केला आहे. गेल्या आठवडाभरात नवीन रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. चीन, दक्षिण कोरिया आणि जर्मनीमध्ये सर्वाधिक रुग्ण वाढले आहेत. कोरोनाच्या झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णांमुळे आता ओमायक्रॉनचा उप-प्रकार असलेल्या व्हायरसने BA.2 चिंता वाढवल्या आहेत. ओमायक्रॉनचे सबव्हेरिएंट BA-2 मुळे युरोपमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 कोरोनाच्या चौथ्या लाटेपासून बचाव


सध्या भारतात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत नसली तरी देखील देशात कोरोनाची चौथी लाट (Forth wave) येण्याची शक्यता तज्ज्ञांनी आधीच वर्तवली आहे. आशिया आणि युरोपमधील काही भागांमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात राज्यांना कोरोनाच्या चौथ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना आखण्याचा इशारा दिला होता. अशा परिस्थितीत देशात कोरोनाची चौथी लाट येण्याची चिन्हे आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चौथ्या लाटेचा अंदाज नाकारला.


गंभीर परिणाम दिसण्याची चिन्ह कमी


भारतातील बहुतेक लोकांना लसीचे (Vaccination) दोन्ही डोस मिळाले आहेत. त्यामुळे जरी लाट आली तरी, त्याचा गंभीर परिणाम दिसण्याची चिन्ह कमी आहेत. हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूच्या बाबतीत होणारे परिणाम नियंत्रित राहण्याची शक्यता आहे.


भारतात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. सद्यस्थिती पाहता भविष्यात नव्या लाटेच्या आगमनाबाबत निश्चितपणे सांगता येणार नाही. भविष्याबद्दल कोणतेही भाकीत करू शकत नाही, कारण संभाव्य नवीन प्रकार अज्ञात आहे. पण जागरुक राहणे आवश्यक आहे.


Omicron BA-2 ची लक्षणे


इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूरच्या अलीकडील अभ्यासात असे म्हटले आहे की, कोरोना महामारीची चौथी लाट 22 जूनपासून सुरू होऊन ऑगस्टच्या मध्यापर्यंत राहण्याची शक्यता आहे. आयआयटी कानपूरच्या संशोधकांचे म्हणणे आहे की, व्हायरसच्या नवीन प्रकाराचा व्यापक परिणाम होण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की चिंतेची बाब म्हणजे त्याची लक्षणेही आश्चर्यकारक आहेत. कोरोनाच्या कोणत्याही प्रकाराच्या बाबतीत, तुम्हाला पोटाशी संबंधित लक्षणे दिसू शकतात. पण Omicron BA-2 मध्ये तुम्हाला आतड्यांसंबंधी समस्या येऊ शकतात. Omicron BA-2 ग्रस्त रुग्णांना मळमळ, अतिसार, उलट्या, ओटीपोटात दुखणे, पोटात जळजळ आणि गोळा येणे यासारखी लक्षणे दिसू शकतात.