मुंबई : कोरोना काळात देशातच काय तर संपूर्ण जगात लॉकडाऊन लागले होते, ज्यामुळे लोकं घरीच थांबले होते आणि त्यांचं वर्कफ्रॉम होम सुरू होतं. ज्यामुळे लोकं आपल्या घरातील लोकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवू लागले. परंतु असं असुन देखील या काळात घटस्फोटाची नोंद मोठ्याप्रमाणावर झाल्या आहेत. आज मंगळवार 26 ऑक्टोबरपासून कुटुंब न्यायालयाचे काम पूर्वीप्रमाणे सुरू झालं आहे. तसेच नवीन नावं नोंदवून घेण्याचीही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी कोरोना काळात कोर्ट बंद असल्यामुळे या नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली होती, ज्यामध्ये एकूण 848 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.


तसेच सप्टेंबरमध्ये झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये वांद्रे येथील कुटुंब न्यायालयात 419 प्रकरणांची नोंद झाली, त्यांपैकी 8 कुटुंबांनी आपपसात ही भांडणं मिटवून हे अर्ज मागे घेतले आहेत.


कोरोनाकाळात सुरूवातीला ही 30 प्रकरणांची नोंद झाली होती, मात्र ही प्रकरणं मार्गी लावण्यास उशीर झाल्यानं ही प्रकरणं वाढतंच गेली. ज्यामुळे आज न्यायालयाकडे एकूण 848 प्रकरणं बाकी आहेत जी आत सोडवण्यात येतील आणि त्याच्यावर योग्यती  कारवाई होईल.


घटस्फोटाला कोरोना कारणीभूत?


एका NGOने दिलेल्या माहितीनुसार कोरोना संसर्गाच्या काळात अनेक लोकांचे रोजगार गेले, ज्यामुळे त्यांना आर्थिक चणचण भासू लागली. ज्या लोकांनी घरासाठी, गाडीसाठी किंवा अन्य कारणांसाठी ज्या लोकांनी कर्ज घेतले होतं, त्याचा हफ्ता देखील भरण्यासाठी लोकांवरती प्रेशर येऊ लागलं. तर घरातील जबाबदाऱ्या घेण्यावरुन देखील अनेकांमध्ये मतभेद होऊ लागले. काही लोकं मोबाईलच्या जास्तीत जास्त वापर करु लागले ज्यामुळे त्यांच्यातील संवाद संपला.


अशा वेगवेगळी कारणं समोर आली आहेत जी कुठेतरी कोरोना आणि या महामारीशी संबंधीत आहेत. तर एका समुपदेशकाने यासंबंधीत एक वेगळा मुद्दा मांडला, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कोरोना काळाच्यापूर्वी देखील हे वाद होतेच. फक्त व्यस्त जिवनशैलीमुळे एकत्र वेळ घालवण्यासाठी लोकांना वेळ मिळत नव्हता, ज्यामुळे लोकांमध्ये फार कमी संभाषण व्हायचं, ज्यामुळे त्यांना त्यांची मत एकमेकांसमोर ठेवायला वेळ मिळत नव्हता.


लोकं आपलं काम करुन कामासाठी घराबाहेर पडायचे त्यानंतर थेट रात्री भेट व्हायची ज्यामुळे लोकं जास्त एकमेकांशी बोलायचे नाही. परंतु लॉकडाऊनकाळामध्ये बाहेर जाता न आल्यामुळे लोकांवरती ताण वाढला आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम लोकांच्या नात्यावरती होऊ लागला. अशी विविध कारणं घटस्फोटाशी संबंधीत समोर आली आहे.