मुंबई : आता बातमी कोरोनाच्या लस संदर्भातील. ऑक्सफर्डमधल्या कोरोनाच्या चाचण्या थांबवण्यात आल्यानंतर भारतातल्या चाचण्याही थांबवण्यात आल्यायत. याचा काय परिणाम होणार आहे. लस कधी मिळणार, पाहुया एक रिपोर्ट.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कधी येणार कोरोनावरची लस याची अख्खं जग वाट पाहात असतानाच एक धक्कादायक बातमी आलीय. ऑर्सफर्ड अॅस्ट्राझेनेकानं कोरोनावरच्या लसीची ट्रायल थांबवलीय... त्यापाठोपाठ त्यांच्याशी टायअप असलेल्या भारतातल्या सिरम इन्स्टिट्युटनंही ट्रायल थांबवल्या गेल्या आहेत.


कोरोना लस ट्रायल्स का थांबली?


लस देण्यात आलेल्या इंग्लंडमधल्या एका स्वयंसेवकाची तब्येत बिघडल्यानं चाचण्या थांबवण्यात आल्या. याचा ट्रायल्सवर काय परिणाम होणार ? चाचण्यांना देण्यात आलेली स्थगिती ही तात्पुरती असणार आहे. कुठल्याही लस निर्मितीवेळी अशा घटना घडत असतात.


ट्रायल्स थांबवल्याचे परिणाम काय?


लस थोडी उशिरा येईल. पण तरीही पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला लस आणण्याचा अॅस्ट्राझेनेकाचा प्रयत्न आहे. भारतात काय परिणाम होईल, याची चर्चा सुरु झाली आहे. पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्युटचं अॅस्ट्राझेनेकाशी टायअप असल्यानं भारतातल्या चाचण्याही थांबवण्यात आल्या आहेत. 


रशिया, चीन, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड. जर्मनी अशा विविध देशांमध्ये सध्या जवळपास १९२ लसी वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. त्यामध्ये सध्या तरी रशियाच्या लसीनं आघाडी घेतलीय. पण तरीही या सगळ्या लस प्रत्यक्ष बाजारात यायला २०२१ उजाडणार आहे.