नवी दिल्ली : देशभरात आजपासून कोविड 19 वॅक्सीनेशन (Corona vaccination) कार्यक्रमाचा शुभारंभ होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सकाळी 10.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लसीकरणाच्या अभियानास (vaccination Programme) सुरुवात करतील. जगातील सर्वात मोठे लसीकरण अभियान (World’s Largest Vaccination Programme) म्हटलं जातंय. पहिल्याच दिवशी 3 लाखाहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.


यांना मिळणार पहिला डोस 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण देशात एकावेळी लसीकरण अभियान राबवले जाईल. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून 3006 लसीकरण केंद्र बनवले गेलेयत. राजस्थानमध्ये जयपूरच्या सवाई मान सिंह मेडिकल कॉलेजचे (Sawai Mansingh Medical College) प्रधानाचार्य सुधीर भंडारी (Sudhir Bhandari) यांना पहिला लसीचा डोस दिला जाणार आहे. मध्यप्रदेशमधील एका रुग्णालयात सुरक्षारक्षक आणि सहायका सहीत सर्वात पहिले डोस घेणाऱ्यांमध्ये असतील.



जगातील सर्वात मोठे लसीकरण अभियान 


हे जगातील सर्वाधिक मोठे लसीकरण अभियान असेल असे पंतप्रधान कार्यालयातून म्हटलंय. कोरोना व्हायरसविरुद्ध (Coronavirus Pandemic) देश आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करतोय असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय.


2 लसींना परवानगी 


देशभरात कोरोनाने थैमान घातल्यानंतर लस आल्याने दिलासा मिळाला आहे. भारतात 2 लसींच्या वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारने 'सीरम इन्स्टिट्यूट' आणि 'भारत बायोटेक' च्या लसींना आपत्कालीन वापरास परवानगी दिल्यानंतर शनिवार प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे. राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी लस पोहोचल्या आहेत. तयारी देखील जवळपास पूर्ण झाली असून उद्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे.


मुंबईत लसीकरण 


मुंबईतील 9 केंद्रांमध्ये जवळपास 12,500 आरोग्य कर्मचाऱ्यांवर लसीकरण करण्यात येणार आहे. एफ दक्षिण प्रभागातून लसीकरणाच्या कुप्यांचं वाटप होणार असून महापालिकेच्या लोकमान्य टिळक, नायर, केईएम, कूपर, कांदिवलीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, घाटकोपरचं राजावाडी, सांताक्रुझमधील व्ही. एन. देसाई, वांद्र्यातील भाभा रुग्णालय आणि बीकेसीमधील जम्बो कोविड सेंटरमध्ये यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.


केईएम रुग्णालयात दररोज 1000 ते 1200 व्यक्तींवर लसीकरण होणार आहे. बुथवर तज्ज्ञांसह पाच जणांचा गट तयार करण्यात आला आहे. मुंबईत आधीच लसी दाखल झाल्या असून ते परळमधील आरोग्यखात्याच्या मुख्य कार्यालयात ठेवण्यात आला आहे.