Good News : 5 + वर्षांच्या मुलांसाठी कोरोना लस, भारतात क्लिनिकल ट्रायलला मंजुरी
Coronavirus in India :कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या संसर्गाच्या दरम्यान, भारतातील मुलांसाठी कोरोना लसीबद्दल एक चांगली बातमी आहे.
मुंबई : Coronavirus in India :कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या संसर्गाच्या दरम्यान, भारतातील मुलांसाठी कोरोना लसीबद्दल एक चांगली बातमी आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) हैदराबादस्थित स्वदेशी फार्मा कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेडला निर्देश दिले आहे. कोविड -19 लसीच्या (Corona Vaccine) दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात काही अटींसह 5 ते 18 वर्षे वयाच्या मुलांना क्लिनिकल चाचणी मंजुरी देण्यात आली आहे. (Covid-19 Vaccine)
मुलांवर चाचणीसाठी चौथी लस मंजूर ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) लसीच्या चाचणीसाठी परवानगी दिली आहे, जी विषय तज्ज्ञ समितीच्या (एसईसी) शिफारशींच्या आधारावर 10 ठिकाणी आयोजित केली जाईल. ही भारताची चौथी कोरोना लस आहे, ज्याला DCGI कडून मुलांवर चाचणीसाठी परवानगी मिळाली आहे.
या लसींना परवानगी मिळाली
यापूर्वी, DCGI ने देशात विकसित केलेल्या Zydus Cadila लस, Zycov-D च्या आणीबाणीच्या वापरास मंजुरी दिली होती, जी देशातील 12 ते 18 वयोगटातील लोकांना उपलब्ध होईल. ही पहिली कोविड -19 विरोधी लस असून या व्यतिरिक्त, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (SII) कोव्हॅक्सला 2 ते 17 वर्षांच्या मुलांवर टप्पा II आणि III च्या चाचण्यांना मंजुरी मिळाली आहे. याशिवाय 5 ते 18 वर्षे वयाच्या मुलांमध्ये भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत.
आतापर्यंत देशभरात 66.3 कोटी डोस दिलेत
भारतामध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस दिली जात आहे आणि आतापर्यंत देशभरात लसीचे 66 कोटी 30 लाख 37 हजार 334 डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत 50 कोटी 97 लाख 99 हजार 626 पहिला डोस देण्यात आला आहे, तर 15 कोटी 32 लाख 37 हजार 708 लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.