Corona Vaccine Update : Covaxin मध्ये कोविडच्या 617 प्रकारांना नष्ट करण्याची क्षमता
कोरोनामुळे रुग्ण संख्या देशात वाढतच चालली आहे. दररोज संक्रमित रुग्ण आणि मृत्यूची नवीन नोंद तयार केली जात आहे.
मुंबई : कोरोनामुळे रुग्ण संख्या देशात वाढतच चालली आहे. दररोज संक्रमित रुग्ण आणि मृत्यूची नवीन नोंद तयार केली जात आहे. अशा परिस्थितीत, प्रत्येकजण शक्य तितक्या लवकर लस घेण्याची वाट पाहत आहे. दरम्यान, एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे की, कोविड -19 विरूद्ध लढा देण्यासाठी विकसित केलेली कोव्हॅक्सिन ही लस कोरोनाचे इतर प्राणघातक विषाणूचे 617 प्रकार नष्ट करण्यास सक्षम असल्याचे आढळले आहे.
कोविडचे 617 प्रकार नष्ट करणारी लस
व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि अमेरिकेचे सर्वोच्च रोगशास्त्रज्ञ डॉ एनथोनी फाउंची (White House Epidemiologist Dr. Anthony Fauci) यांनी मंगळवारी एका परिषदेत पत्रकारांना सांगितले की, "दररोज आम्हाला नवीन डेटा मिळत आहे. परंतु आकडेवारीत कोविड -19 रुग्णांचे रक्ताचे नमुन्यांमध्ये भारतात वापरली जाणारी कोव्हॅक्सीन लस दिली गेली आहे त्यांचा समावेश आहे. यामध्ये कोविडचे एकूण 617 प्रकार नष्ट करण्याची क्षमता असल्याचे आढळले आहे."
डॉ एनथोनी पुढे म्हणाले, "भारतात आपण जी कठीण परिस्थितीत पाहात आहोत, लसीकरण त्यास उपयुक्त ठरू शकते."
अँन्टीबॅाडीज बनवण्याचे कार्य
न्यूयॉर्क टाईम्सने मंगळवारी दिलेल्या वृत्तानुसार, कोव्हॅस्किन सार्स-सीओव्ही-2 कोरोना विषाणूविरूद्ध अँन्टीबॅाडीज बनविण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीला ओळखुन कार्य करते. हे अँटीबॉडीज त्याच्या पृष्ठभागावर पसरलेल्या व्हायरल प्रोटीनसारख्या नियोजित स्पाइक प्रोटीनशी बांधले जातात.
ही लस 78 टक्के प्रभावी
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि इंडियन कॅान्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या सहकार्याने, भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिनचा वापर करण्यास 3 जानेवारी रोजी मान्यता देण्यात आली. चाचणी निकालानंतर ही लस 78 टक्के पर्यंत प्रभावी असल्याचे दिसून आले.
संक्रमणापासून मृत्यूपर्यंतचा डेटा
देशभरात एकाच दिवसात 3,60,960 कोरोना विषाणूच्या संक्रमित लोकांची संख्या वाढल्यानंतर बुधवारी, संक्रमित रुग्णांचा आकडा 1,79,97,267 वर गेला आहे. तसेच गेल्या 24 तासांत 3,293 लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशभरात आतापर्यंत संक्रमणाने मृत्यू झालेल्या लोकांची संख्या वाढून 2,01,187 झाली आहे. तर देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 29,78,709 वर पोचली आहे.