नवी दिल्ली : केरळ (Kerala) चे मुख्यमंत्री पिनरायी विजयन (Pinarayi Vijayan) राज्यात कोरोना वॅक्सिन (Corona vaccine) मोफत देण्याची घोषणा केलीय. केरळमध्ये लसीकरण मोफत होईल, यासाठी कोणताही चार्ज घेतला जाणार नाही असे त्यांनी सांगितले. याआधी मध्य प्रदेश, आसाम, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालसहीत राज्यांनी मोफत वॅक्सिनची घोषणा केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केरळमध्ये संक्रमितांची संख्या ६.६४ लाखांवर 


शनिवारी केरळमध्ये ५,९४९ नवे रुग्ण आढळले आणि ३२ जणांचा मृत्यू झाला. यासोबतच राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ६.६४ लाख झाली. मृतांची संख्या वाढून २,५९४ इतकी झाली. राज्यामध्ये आता ४३७ कोरोना हॉटस्पॉट बनलेयत.



शिवराज सिंह चौहान यांची घोषणा 


मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील कोरोना वॅक्सिन संदर्भात घोषणा केलीय. मध्य प्रदेशच्या सर्व नागरिकांना मोफत (Corona vaccine) दिले जाईल असे ट्वीट शिवराज सिंह चौहान यांनी केले. कोरोना लसीकरणास सुरुवात झाल्यापासून आपण हा खर्च करु शकू का ? हा प्रत्येक सर्वसामान्यांना प्रश्न पडलाय. मध्य प्रदेशात प्रत्येक गरीबाला मोफत लस मिळेल. आपण हे युद्ध जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


आसाम, तेलंगणा, तामिळनाडू देखील या स्पर्धेत मागे नाहीत. शिवराज चौहान यांच्या व्यतिरिक्त आरोग्य मंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी देखील राज्यात कोरोना वॅक्सीन (Corona vaccine) मोफत देण्याची घोषणा केली. तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानिस्वामी यांनी देखील जनतेला मोफत वॅक्सिन देण्याची घोषणा केली. तेलंगणाचे आरोग्यमंत्री इटेला राजेंदर यांनी देखील गरीब आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत वॅक्सिनची घोषणा केली.