JEE Main Exam 2021 परीक्षा स्थगित, NTA चा निर्णय
JEE Main Exam 2021 देखील पुढे ढकलण्याचा निर्णय
नवी दिल्ली : देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. या पार्श्वभुमीवर राज्यासहीत देशपातळीवरील अनेक परीक्षा पुढ ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात दहावी, बारावी, एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. दरम्यान JEE Main Exam 2021 देखील पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने देशभरात वेगाने वाढणार्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता हा निर्णय घेतलाय. एप्रिलमध्ये होणारी जेईई मेन 2021 ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
जेईई मेन 2021 परीक्षेची दोन सत्रे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये पूर्ण झाली आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणानंतर राष्ट्रीय चाचणी संस्थेकडे विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात मागणी केली होती. हे पाहता हा निर्णय घेण्यात आला.
JEE Main 2021 Exam 27 ते 30 एप्रिल दरम्यान होणार होती. परीक्षेच्या नव्या तारखेची माहिती 15 दिवस आधी दिली जाईल असे नॅशनल टेस्टींग एजंसीने म्हटलंय.