लखनऊ : देशामध्ये कोरोना विषाणूच्या घटनात झपाट्याने वाढ होत आहे. अशातच उत्तर प्रदेशातील कानपूर येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. आपले कर्तव्य बजावणाऱ्या तैनात महिला पोलीस कर्मचारी कोरोना संक्रमित झाली. त्यानंतर या महिला पोलिसाचा मृत्यू झाला. दरम्यान, या महिला पोलीस कर्मचाऱ्याने चार दिवसांपूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोएडा -२ एसीपी रजनीश यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केले आहेत. त्यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. '' माझ्या जवळ शब्द नाहीत, या कोरोना योद्धासाठी. एक लहान मुलगा आणि दुसरे बाळ पाच दिवसांचे आहे. कोरोनाची लढाई लढताना या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू होणे होणे एक दुखद घटना आहे. माझ्याजवळ शब्द नाही, मी निशब्द आहे.! ''



मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, महिला पोलीस कर्मचाऱ्याची कोरोना तपासणीसाठी सॅम्पल घेतले होते. मात्र, रिपोर्ट येण्याआधीच या महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत्यूनंतर या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.


 महिला पोलीस कर्मचारी कानपूर जिल्ह्यातील बिल्हौर पोलीस ठाण्यात कार्यरथ होती. ती प्रेग्नंट असल्याने तिने ५ एप्रिलपर्यंत सुट्टी घेतली होती. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनंतर या  महिला पोलीस कर्मचाऱ्याची तब्बेत अचानक बिघडली. तिला रुग्णालदात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयाने उपचार करण्यात नकार दिला. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता तिचा मृत्यू झाला.


 उत्तर प्रदेशात आरोग्य विभाने जारी केलेल्या माहितीनुसार २९९८ लोक हे कोरोना बाधित आहेत. आतापर्यंत ६० जणांचा मृत्यू झाला आहे. तर  देशात कोरोना बाधितांचा आकडा ५२९५२ इतका झाला आहे. १७८३ लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.