नवी दिल्ली : Corona Cases in Parliament : देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्याही वाढत आहे. देशाच्या संसदेत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. संसदेतील 718 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. देशात गेल्या 24 तासात 1 लाख 94 हजारांपेक्षा नवे रुग्ण आढळून आले आहेत. (Coronavirus - 718 employees covid positive in Parliament)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण कमी आहे. देशात गेल्या 21 दिवसांतील ही सर्वात मोठी रुग्णवाढ आहे. कोरोना संसदेत पोहोचल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. संसदेचे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. यापार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. एका महिन्यात संसदेतील  718 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, 9 जानेवारीला 400 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती.



कोरोना बाधितांपैकी जवळपास 200 कर्मचारी हे राज्यसभेतील आहेत. दरम्यान, कोरोना काळात लोकसभा आणि राज्यसभेतील एक तृतीयांश कर्मचाऱ्यांना होम फ्रॉम वर्क करण्याची परवानगी देण्यात आली आहे. असे असताना मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याचा परिमाण हा अर्थसंकल्पीय अधिवेशनावर होऊ शकतो.


मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित कर्मचारी सापडल्याने लोकसभेच्या कामाचे वेळापत्रक कठोरपणे पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्रीय अर्थसंक्लप हा 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जातो. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात अधिवेशानाला सुरुवात होणे अपेक्षीत आहे. तसेच काही खासदार आणि केंद्रीय मंत्र्याना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भारती पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.