नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसचा वेगाने फैलाव होत आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून कोरोनाग्रस्तांचा आकडा 7447 वर पोहचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 239 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 642 लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या 24 तासांत 40 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. 


कोरोनाविरोधात लढण्यासाठी भारत पूर्णत: कार्यक्षम आहे. देशात 1 लाखांहून अधिक बेड कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. कोरोनाच्या उपचारासाठी 586 रुग्णालयं तयार करण्यात आली आहेत. कोरोनाच्या सध्याच्या स्थितीवर काम करण्यात येत आहे. एन95 मास्क, व्हेन्टिलेटरवर काम सुरु असल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं.


सर्व राज्यातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्याबाबत सांगण्यात आलं आहे. गाव-खेड्यातील लोकांनी जागरुक करण्यात येत आहे. तसंच सर्व जण मिळून एकत्रितपणे कोरोनाला हरवूया असा विश्वास आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केला आहे.