मुंबई : कोरोनाचा (Coronavirus) धोका दिवसागणिक वाढत आहे. यातच आता नव्या स्ट्रेनचा (Corona new strain) जास्त धोका असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे आता प्रत्येकांने काळजी घेण्याची गरज आहे, अन्यथा जीवानाशी जाल, असा इशारा देण्यात आला आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची वेगळीच लक्षणं समोर येत आहेत. उलट्या, पोटदुखी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणे आहेत. याचा थेट  परिणाम घसा, फुफ्फुस आणि मेंदूवर होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे उलट्या, अस्वस्था, पोटदुखी आणि अतिसाराचा सामना करावा लागत आहे. या नव्या स्ट्रेनचा थेट परिणाम घसा, फुफ्फुस आणि मेंदूवर होतो. त्यामुळे उलट्या, पोटदुखीचा त्रास होत असल्याचे तज्ज्ञांचं म्हणणे आहे. दिल्लीत नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यातील काही रुग्णांमध्ये ही लक्षणे आढळलून आली आहेत. नवी लक्षणं असलेल्या बहुतेक रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. याचसोबत पूर्वीप्रमाणे वास न येणे, अन्नाला चव न लागणे अशी विविध लक्षणंही दिसून येत आहेत. 


देशात कोरोनाच्या विरुद्ध लढा सुरु आहे. दरम्यान, पुन्हा एकदा देशात कोरोना विषाणूचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले आहे. त्यापैकी महाराष्ट्र, पंजाब या राज्यांत सर्वाधिक रुग्ण वाढ होत आहेत. एकीकडे कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे देश चिंतेत आहे तर दुसरीकडे आणखी एका नवीन धोका तयार झाल्याने सरकार आणि देशाच्या अडचणी वाढवल्या आहेत. देशात कोरोना विषाणूचा नवीन 'डबल म्युटंट' प्रकार सापडला आहे.


देशातील 18 राज्यांमध्ये बरेच 'व्हेरिएंट्स ऑफ कन्सर्न्स' (व्हीओसी) सापडले आहेत. म्हणजेच कोरोना विषाणूचे वेगवेगळे प्रकार देशाच्या विविध भागात आढळले आहेत, ज्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. या कोरोना प्रकारांमध्ये ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील तसेच भारतात आढळणार्‍या नवीन प्रकारांचा समावेश आहे.


कोरोना  विषाणूमध्ये सतत बदल होत असतो आणि ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. विषाणूचे रूप बदलत राहते आणि त्याची अंतर्गत रचना बदलत राहते. जेव्हा एखादा व्हायरस फॉर्म बदलतो, तो पूर्ण होत नाही, त्याचे काही घटक शिल्लक असतात आणि यालाच आपण म्यूटेशन (Mutation) म्हणतो. जेव्हा त्या म्यूटेशन मानवी शरीरावर परिणाम करतो, तेव्हा त्यास वेरिएंट (Variant) म्हणतात.