CoronaVirus: `या` महिन्यापर्यंत भारतीयांना मिळणार कोरोना लस, इतकी असेल किंमत
ठरलं तर.....
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या coronavirus दुसऱ्या लाटेची दहशत असताना आणि काही राज्य मात्र या विषाणूच्या संकटापासून सावरण्याच्या प्रयत्नांत आहेत. अशातच आता एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. Serum Institute of India सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला Adar Poonawalla यांनी ही बातमी देत मोठा दिलासा देऊ केला आहे.
आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठ व्यक्तींसाठी कोरोनाची ही लस फेब्रुवारी 2021 पर्यंत आणि सर्वसामान्य जनतेसाठी एप्रिलपर्यंत बाजारात येईल. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनीही दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन- चार महिन्यांमध्ये भारतात कोरोनाची लस उपलब्ध होणार आहे. ज्यासाठी केंद्र आतापासूनच तयारीला लागलं आहे.
500 ते 1000 रुपयांना कोरोना लसीचे दोन डोस उपलब्ध होणार आहेत. हिंदुस्तान टाईम्स लीडरशीप समीटमध्ये बोलताना केलेल्या वक्तव्यानुसार 2024 पर्यंत अंदाजे प्रत्येक भारतीयाला कोरोनाची लस मिळालेली असेल.
कोरोना लसीवरील काम वेगानं सुरु
कोरोना लसीचं परीक्षण हे शेवटच्या टप्प्यात असून, आतापर्यंतचे सर्व परिणाम सकारात्मक असल्याचं पूनावाला यांनी स्पष्ट केलं. शिवाय यापुढी निकालही सकारात्मकच असेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. भारत सरकारला ही लस कमी दरात उपलब्ध करुन दिली जाणार आहे, असंही ते म्हणाले.
लसीचे परिणाम...
कोरोना लसीच्या परिणामांबाबत विचारलं असता, या लसीचा ज्येष्ठांवर चांगला परिणाम झाल्याचं त्यांनी सांगितलं. पुढील दोन- तीन आठवड्यांमध्ये या लसीचे निकाल ब्रिटनमध्ये पाहायला मिळतील. सीरम इन्स्टिट्यूट ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि आस्ट्रेजेनेकातर्फे विकसित देशांमध्ये या लसीची चाचणी सुरू आहे.