मुंबई : भारतात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने परिस्थिती गंभीर होत चाचली आहे. (Coronavirus in India) अनेकांचे मृत्यू होत आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही गंभीर परिस्थिती पाहायला मिळत आहे. आता कोरोनाचा शिरकाव दूतावासात झाला आहे. टांझानियाचे संरक्षण सल्लागारांना कोरोनाची लागण झाली आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. टांझानिया हाय कमिशनच्या अधिकाऱ्याचे (Tanzania High Commission) कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. Tanzania हे अधिकारी उच्चायोगात संरक्षण सल्लागार म्हणून कार्यरत होते. परदेशी मिशनच्या एखाद्या कर्मचाऱ्याचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाल्याची ही पहिली घटना आहे.


27 एप्रिल रोजी प्रकृती बिघडली होती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबाबत माहिती असलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार कर्नल मोसेस बीटस मलूला हे दिल्लीतील टांझानिया हाय कमिशनमध्ये (Tanzania High Commission) कार्यरत होते. 27 एप्रिल रोजी त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना उपचारासाठी मोठ्या खासगी रुग्णालयात नेले, पण तेथे त्यांना बेड उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे रुग्णालयाने त्याला दाखल करण्यास नकार दिला.


भारतीय लष्कराची मदत घेतली


यानंतर टांझानिया उच्चायोगाने (Tanzania High Commission)  भारतीय सैन्याशी संपर्क  (Indian Army) साधला आणि मदत मागितली. भारतीय सैन्याने त्वरित कारवाई केली आणि त्यांना दिल्ली कॅन्टोन्मेंटमधील 92 बेस हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यासह त्याच्या उपचारासाठी एक टीमही तयार करण्यात आली आहे.


28 एप्रिल रोजी निधन  


भारतीय सैन्याने केलेले प्रयत्न व्यर्थ ठरले. 28 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. भारतीय अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तथापि, टांझानिया हाय कमिशनने परदेशी मिशन आणि यूएन एजन्सींशी अंतर्गत मुलाखतीत कर्नल मोसेस बीटस मलूला यांच्या मृत्यूचा उल्लेख केला आहे.


कोरोना वेगाला ब्रेक?


असे सांगितले जात आहे की, देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या अनियंत्रित वेगाला काही दिवसात ब्रेक लागण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 3,68,147 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी, कोरोना संसर्गामुळे 3,417 लोक मरण पावले, परंतु दूतावासांमध्ये कोरोनाचा शिरकाव ही चिंताजनक बाब मानली जात आहे.