मुंबई : भारतात आता कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढत आहे. १६८ रूग्णांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर ३ रूग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. कर्नाटकातही COVID-19चे सात नवे रूग्ण आढळले आहेत. आपल्याला माहितच आहे बंगलुरूही आयटी सिटी म्हणून ओळखली जाते. इथल्या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्क फ्रॉम होम देण्यात आलंय. पण इथल्या एका कंपनीने एक अजब शक्कल लढवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शॅडोफॅक्स Shadowfax  कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिलं आहे. पण ९ तास कर्मचाऱ्यांनी कॅमेरासमोर बसून काम करायचं आहे. वर्क फ्रॉम होमच्या काळात कर्मचाऱ्यांना भरपगारी दिवस भरून दिले जातात. म्हणून कर्मचाऱ्यांना नऊ तास कॅमेऱ्यासमोर काम करण्याची जबरदस्ती केली जाते. यामुळे कंपनीचा आपल्या कर्मचाऱ्यांवर विश्वास नसल्याचं अधोरेखित झालं आहे. देशावर आलेल्या संकटाशी दोन हात करण्यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कंपनीने जागतिक साथीच्या रोगाकरता आपल्या पॉलिसीमध्ये बदल देखील केले आहेत. 



शॅडोफॅक्स Shadowfax कंपनी ही बंगलुरूतील लॉजिस्टिक कंपनी आहे. या कंपनीत ५८२ कर्मचारी काम करत आहेत. २०१५ मध्ये या कंपनीची स्थापना सीईओ नरेश बन्सल यांनी केली आहे. या कंपनीची वर्षाची उलाढाल ही १०.९ मिलियन असून ५०० हून अधिक शहरांमध्ये त्यांचा माल पोहोचवला जातो.