नवी दिल्ली : देशभरामध्ये मागच्या २४ तासात कोरोनाचे २,४८७ रुग्ण समोर आले आहेत. तर एका दिवसात ८३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतात आत्तापर्यंत कोरोनाचे ४०,२६३ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. यातले १३ हजार रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. याआकडेवारीनुसार देशातील प्रत्येक ३ रुग्णांपैकी १ रुग्ण महाराष्ट्रात आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत १,३०६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनातून १०,८८७ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या २४ तासामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या रेकॉर्ड वाढली आहे, तर मृत्यूही सर्वाधिक झाले आहेत. मागच्या २४ तासांची सरासरी बघितली तर कोरोनामुळे तासाला ३ मृत्यू झाले आहेत, तर प्रत्येक तासाला कोरोनाचे ११० रुग्ण समोर आले आहेत. 



मागच्या ५ दिवसात कोरोनाचे १० हजार रुग्ण वाढले आहेत. या ५ दिवसांमध्ये ३०० पेक्षा जास्त जणांना जीवही गमवावा लागला आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार देशभरात कोरोनाची चाचणी जलदगतीने घेतली जात आहे. ३ मेपर्यत देशात १० लाख ४६ हजार ४५० चाचण्या झाल्या आहेत. जवळपास १०.५० लाख चाचण्यांमध्ये कोरोनाचे ४० हजार रुग्ण आढळले.


२७ एप्रिल, सकाळी ८ वाजता- एकूण रुग्ण- २७,८९२


२७ एप्रिल, संध्याकाळी ६ वाजता- एकूण रुग्ण- २८,३८०


२८ एप्रिल, सकाळी ८ वाजता- एकूण रुग्ण- २९,४३५


२९ एप्रिल, सकाळी ८ वाजता- एकूण रुग्ण- ३१,३३२


३० एप्रिल, सकाळी ८ वाजता- एकूण रुग्ण- ३३,०५०


१ मे, सकाळी ८ वाजता- एकूण रुग्ण- ३५,०४३


१ मे, संध्याकाळी ६ वाजता- एकूण रुग्ण- ३५,३६५


२ मे, सकाळी ८ वाजता- एकूण रुग्ण- ३७,३३६


३ मे, संध्याकाळी ६ वाजता- एकूण रुग्ण- ४०,२६३