मुंबई : कोरोना व्हायरसचा धोका वाढत असतानाच अनेक विभागांवर याचे थेट परिणाम पाहायला मिळत आहेत. नोकऱ्यांपासून दैनंदिन जीवनापर्यंत याचे परिणाम आता दिसून येऊ लागले आहेत. याच परिस्थितीमध्ये काही क्षेत्रांतील नोकऱ्यांना या परिस्थितीचा सर्वाधिक धोका असल्याची बाब समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विमानसेवा आणि हॉस्पिटॅलिटी अशा क्षेत्रांवना कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा सर्वाधिक फटका बसला आहे. ज्यामुळे देशातील खासगी विमानतळांवर काम करणाऱ्या संचालकांसह जवळपास २ लाखांहून अधिकजणांच्या नोकरीचा मोठा प्रश्न आता उभा राहिला आहे. 


असोसिएशन ऑफ प्राइवेट एयरपोर्ट ऑपरेर्ट्स(APAO) कडून केंद्र सरकारलाही या प्रकरणाची दखल घेण्यासंबंधीची विनंती करण्यात आली आहे. ज्याअंतर्गत फक्त आर्थिक तरतुदच नव्हे, तर या क्षेत्राचं काम सुरु राहण्यासाठीसुद्धा काही तरतुदी निर्माण करण्याबाबत सांगण्यात येत आहे. 


सध्याच्या घडीला विमानतळांवर कार्यरत असणाऱ्या २ लाख ४० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या अडचणीत आहेत. ज्यामध्ये काही संचालकांचाही समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, नोकरदार वर्गाच्या कपातीचा सामनाही येत्या काळात नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद येथील काही खासगी विमानतळ व्यवस्थापकांना आणि तेथील कर्मचाऱ्यांना करावा लागणार आहे. 


 


गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या लॉकडाऊनची शेवटची तारीख ही १४ एप्रिलपर्यंत आहे. या काळात कोणत्याही प्रकारचं आंतरदेशीय किंवा आंतरराष्ट्रीय उड्डाण केलं जात नाही आहे. फक्त आणि फक्त कार्गो संचालनालाच यात मुभा देण्यात आली आहे. ज्यामुळे विमान कंपन्याचं मोठ्या प्रमाणआत नुकसान होत आहे. तेव्हा आता खासगी विमानतळांवरील या कर्मचारी वर्गासाठी येत्या काळात कोणते उपाय योजले जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.