नवी दिल्ली : भारतात सतत वाढणाऱ्या कोरोना रुग्णांबाबत एक दिलासादायक बाब समोर आली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग मंदावला आहे. कोरोना व्हायरसची प्रकरणं दुप्पट होण्याचा वेळ 13.6 दिवस इतका झाला आहे. गेल्या 14 दिवसांपूर्वी हा दर 11.5 दिवस होता. भारतात मृत्यू दर कमी होऊन तो 3.1 टक्के इतका झाला आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दरही सुधारला असून तो 37.5 टक्के झाला आहे. रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 106 दिवसांमध्ये 80 हजारांवर पोहचली. तर ब्रिटन, इटली, स्पेन, जर्मनी आणि अमरिकेमध्ये कोरोना रुग्णांची हीच आकडेवारी 44 ते 66 दिवसांमध्ये पोहचली होती, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिली. 


रविवारी एका दिवसांत भारतात कोरोनाचे सर्वाधिक तब्बल 5 हजार रुग्ण वाढले. 


केरळच्या आरोग्यमंत्री केके शैलजा ठरल्या 'कोविड-१९ रणरागिणी'


अरुणाचल प्रदेश, चंडीगड, लडाख, मेघालय, मिझोराम, पदुच्चेरी, अंदमान-निकोबार आणि दादरा नगर हवेली अशा राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून या आठ भागात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण आढळला नाही. 


तर दुसरीकडे सिक्किम, नागालँड, दमण-दीव, लक्षद्वीपमध्ये आतापर्यंत एकाही कोरोना रुग्णांची नोंद झालेली नसल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं.


दरम्यान, सोमवार 18 मेपासून देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) रविवारी 31 मेपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली.


आता 'या' निकषांवर होणार कोरोना टेस्ट


देशात आतापर्यंत 96 हजार 196 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 3 हजार 49 जणांचा मृत्यू झाला. तर 36 हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.