आता 'या' निकषांवर होणार कोरोना टेस्ट

आययीएमआरचे नवे नियम व अटी लागू   

Updated: May 18, 2020, 05:23 PM IST
आता 'या' निकषांवर होणार कोरोना टेस्ट
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : CORONA कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता दर दिवशी भारतीय आरोग्य मंत्रालयाकडून काही महत्त्वाच्या घोषणा, इशारे आणि मार्गदर्शक सल्ले देण्यात येत आहेत. शक्य त्या सर्व परिंनी देशात कोरोना विषाणूचा वाढणारा संसर्ग कशा प्रकारे रोखता येईल यासाठीच सारे प्रयत्न सुरु आहेत. चत्यात रॅंडम टेस्टिंगपासून रॅपिड टेस्टिंगपर्यंतच्या पर्यायांचा समावेश आहे. 

सध्याच्या घडीला भारतात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आययीएमआरकडून कोविड 19च्या टेस्टसाठीचे काही नवे निकष प्रसिद्ध करण्यात आले आहेत. 

वाचा : दिलासादायक : युरोपातील 'हा' देश कोरोना मुक्त

 

- कोरोनाची सर्व लक्षणं आणि प्रवास करुन आलेल्यांनी चाचणी करावी. 

- कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तींच्या सानिध्य्यात आलेल्या आणि कोविड 19ची सर्व लक्षणं असणाऱ्यांनी चाचणी करावी. 

- आरोग्य खात्यातील कर्मचारी, कंटेन्मेंट झोनमधील फ्रंटलाईन कर्मचायरी वर्गानेही सावधगिरी म्हणून कोरोनाची चाचणी करावी.

- Severe Acute Respiratory Infection अर्थात SARI असणाऱ्यांचीही कोरोना चाचणी अनिवार्य. 

- कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या तरीही या विषाणूच्या संसर्गाची कोणतीही लक्षणं नसणाऱ्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करावी. 

- कंटेन्मेंट झोन आणि हॉटस्पॉट क्षेत्रात येणाऱ्या आणि कोरोनासदृश लक्षणं असणाऱ्यांचीही चाचणी होणं आवश्यक आहे. 

- परतीचा किंवा कोणताही प्रवास केल्यानंतर सलग सात दिवस प्रकृती बिघडलेली असल्यास चाचणी करणं गरजेचं. 

 

कोरोनाच्या चाचणीसंदर्भात आयसीएमआरकडून देण्यात आलेले हे नवे निकष आणि मार्गदर्शक तत्तव पाहता येत्या काळात या विषाणूवर सर्वतोपरी मात करण्यासाठी आणखी कठोर पावलं उचलली जाणार असून, चाचण्यांची संख्या वाढवून कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून काढण्यावर यंत्रणांचा अधिक भर असणार आहे.