नवी दिल्ली : कोरोना वायरसच्या प्रादुर्भावाचा परिणाम आज शेअर बाजारावरही पाहायला मिळाला. भारत सरकारने खबरदारीची पाऊले उचलत परदेशातून येणारे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सकाळपासूनच मोठी घसरण पाहायला मिळाली. इतक्या मोठ्या घसरणीनंतर खुला बाजार सावरु शकला नाही. जागतिक आरोग्य संस्थेने (WHO) कोरोना वायरसला गंभीर आजार घोषित केल्यानंतर सेंसेक्स आणि निफ्टी उभे राहु शकले नाही. परदेशी बाजारातून मिळालेल्या निराशाजनक संकेतांच्या दबावामुळे सेंसेक्स २,९१९ अंकानपासून ३२,७७८ वर बंद झाला. तर निफ्टी ८६८ अंकानी घसरुन ९,५९० वर बंद झाला. २००८ नंतरची आतापर्यंतची ही सर्वात मोठी घसरण असल्याचे जाणकार सांगतात.


या कंपन्यांना नुकसान 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मिळालेल्या माहितीनुसार डीएफसी बॅंक, रिलायन्स इंडस्ट्री, आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी, एक्सिस बॅंक, टीसीएम आणि कोटक महिंद्रा बॅंकेवर गुरुवारी घसरणीचा सर्वात जास्त परिणाम झाला. 


याचप्रकारे निफ्टीमध्ये भारत पेट्रोलियम, टाटा मोटर्स, अदानी पोर्ट, महिंद्रा एंड महिंद्रा, हिरो मोटोकॉप, ओएनजीसी आणि गेल ला खूप नुकसान झाले. 


कोरोना वायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याचा परिणाम शेअर बाजारावर दिसला. कोरोनाचा विळखा आणि आंतरराष्ट्री बाजारात कच्चा तेलाची घसरण यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट घोंघावले. यामुळे विक्रीचा दबाव वाढला.


डॉलरच्या तुलनेत रुपया मागच्या सत्रात ६१ पैशांनी घसरुन ७४.२५ रुपये प्रति डॉलर वर खुला झाला. मागच्या सत्रातील मजबुतीसोबत ७३.६४ रुपये प्रति डॉलपवर बंद झाला होता.