पणजी : गोव्यात कोरोना व्हायरसमुळे पहिल्याच व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण झालेल्या 85 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा बळी गेला आहे. गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी याबाबत माहिती दिली आहे. आरोग्य मंत्र्यांनी लोकांना आम्ही योग्य ती खबरदारी घेत असून लोकांनी घाबरु नये, असं सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोव्यात आतापर्यंत कोरोनाचे 683 रुग्ण आढळले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. गोव्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 100 टक्के होतं. परंतु आता एकाचा मृत्यू झाल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.




देशात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारी देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या सव्वा चार लाखांवर पोहचली आहे. देशात गेल्या 11 दिवसांपासून दररोज 10 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 14,821  नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर गेल्या 24 तासांत 445 जणांचा मृत्यू झाला आहे. सतत वाढणारी कोरोनाग्रस्तांची आकडेवारी देशाची चिंता वाढवणारी आहे.



पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; लष्कराचे नायब सुभेदार शहीद


देशात आतापर्यंत 2,37,196 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या देशातील 1,74,387 जणांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत देशात 13,699 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्ण वाढत असताना दिलासादायक बाब म्हणजे रुग्णांचा रिकव्हरी रेट सुधारला आहे. कोरोनामधून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. देशातील रिकव्हरी रेट वाढून 55.77 टक्के इतका झाला आहे.


indiavschina : तणावग्रस्त परिस्थितीमुळं हवाई दलाला 'हे' महत्त्वाचे आदेश