मुंबई : संपूर्ण जगावार कोरोनाच सावट असताना आता आर्थिक मंदीचा प्रश्न देखील उभा राहिला आहे. सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गेल्या एका महिन्यापासून सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या आठवड्यात सोन्याची किंमत ही सर्व रेकॉर्ड मोडणारी नोंदवली जाणार आहे. 


दहा ग्रॅम सोन्याची किंमत ४६,००० रुपये 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. हा दर जवळपास साडे सात सालच्या उंचीवर पोहोचला आहे. यामुळे भारतीय सोन्याच्या बाजारातही वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सात एप्रलला सोन्याच्या बाजारात ४५,७२० असा सोन्याचा दर होता. जो स्तर आतापर्यंत सर्वात उंच होता. मात्र या आठवड्यात सोन्याचा दर हा उच्चांक गाठणार असून ४६,००० रुपये इतका होणार आहे. 


आंतरराष्ट्रीय बाजारात कॉमेक्सवर गेल्या आठवड्यात सोन्याचा दर हा १७५४.५०डॉलर प्रति होता. ही उंची गाठल्यानंतर हा दर १,७५२ डॉलर प्रति एवढा झाला आहे. ऑक्टोबर २०१२ मध्ये सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. 

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला होता. आता तो पुढे वाढवून ३० एप्रिलपर्यंत नेण्यात आला आहे. कोरोनाचा परिणाम हा अर्थव्यवस्थेवर देखील झाला आहे.