Coronavirus Guideline: संपूर्ण जगातून कोरोना (Corona) परतीच्या वाटेवर लागला आहे, असं चित्र असतानाच पुन्हा एकदा चीनमध्ये या व्हायरसचे रूग्ण वाढताना दिसतायत. चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने (New Varient) थैमान घातलं असून परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसतेय. दरम्यान चीनमधील परिस्थिती पाहता, भारत सरकार (Indian Government) अलर्ट मोडवर आलं आहे. यासाठीच कोरोनाला रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health ministry) सुधारित गाईडलाईन्स (Coronavirus Guideline) जारी केल्या आहेत.  


आरोग्य मंत्रालयाकडून कोरोनाबाबत गाईडलाईन्स जारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शन तत्त्वांनुसार, चीन, जपान, दक्षिण कोरिया, हॉंगकॉंग तसंच थायलंड या ठिकाणहून येणाऱ्या प्रवाशांसाठी 72 तासांपूर्वी करण्यात आलेली RTPCR टेस्ट रिपोर्ट अपलोड करणं बंधनकारक असणार आहे. Transiting प्रवाशांसाठी देखील हे अनिवार्य असून, भारतात आल्यानंतर पुन्हा त्यांची टेस्ट होणार आहे. 


कोरोना व्हायरस affected देशातून भारतात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 72 तासांपूर्वी निगेटीव्ह rt-pcr रिपोर्ट अपलोड करणं गरजेचं असणार आहे. यासोबत प्रवाशांना सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरणं गरजेचं असणार आहे. इतकंच नाही तर ज्या व्यक्ती दुसऱ्या देशातून येणार आहेत आणि या 6 देशातून ट्रांझिटच्या माध्यमातून भारतात परतणार आहेत, त्यांना एअरपोर्टवर लँड करण्यापूर्वी 72 तासांपूर्वी निगेटीव्ह rt-pcr रिपोर्ट देणं बंधनकारक आहे.


चीनमध्ये कोरोनाचं थैमान


काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार चीनमध्ये एका दिवसात 10 हजारांहून अधिक मृतदेह शांघायमधील शवागारात पोहोचले. हा आकडा संपूर्ण जगाच्या चिंतेत भर टाकणारा आहे. चीनमधून समोर येणाऱ्या वृत्तानुसार इथं करोना रुग्णांची संख्या काही केल्या नियंत्रणात येण्याचं नाव घेत नाहीये. 


चीनमध्ये निम्म्या लोकसंख्येला कोरोनाची लागण


चीनमध्ये कोरोना स्थिती काही केल्या नियंत्रणात येत नसून, त्यातच आता शांघायमधील एका रुग्णालयाकडून शहरातील जवळपास 25 दशलक्ष लोकसंख्येपैकी निम्म्या लोकांना या विषाणूची लागण होईल असा अंदाज वर्तवला आहे. किंबहुना येणारे दिवस आव्हानात्मक असल्याचं लक्षात घेत रुग्णालयाने कर्मचार्‍यांना या धर्तीवर तयार राहण्याचा इशाराही दिला आहे.


रुग्णसंख्येत अवघ्या काही दिवसांमध्ये दुपटीने वाढ 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शांघायमध्येही आपात्कालीन दूरध्वनी क्रमांक जारी करण्यात आला होता. 28 डिसेंबरला 120 या क्रमांकावर 48534 इतके फोन आले. तर, इथं रुग्णवाहिकांनी 7 हजारहून अधिक फेऱ्या मारल्या. दरम्यान, चीनमधील स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार नव्यानं कोरोनाची लागण झालेल्या रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ नोंदवली जात आहे. ज्यामुळं या घडीला अवघ्या काही तासांतच Emergancy Ward मधील रुग्णांची संख्या दुपटीनं वाढली आहे.