Coronavirus Updates : देशात कोरोना विषाणुचा पुन्हा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोना व्हेरिएंटचा पॉझिटिव्ह रेटही वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. केंद्र सरकारने राज्यांना कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. देशातत एकाच दिवसात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे 1,573 नवीन रुग्ण समोर आले आहेत. सध्या देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 10 हजार  981 आहेत. त्याचबरोबर गेल्या 24 तासांत कोरोनाने कोणाचाही मृत्यू झाला नाही, ही चांगली बाब असलती तर केरळमध्ये सोमवारी कोरोनाने चार रुग्णांचा मृत्यू झाला होता. अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, 10 आणि 11 एप्रिल रोजी मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले आहे.


देशात 32 जिल्ह्यांमध्ये कोरोना झपाट्याने वाढ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना रुग्णांची संख्या देशात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याची सूचना करण्यात आली आहे. कोरोनाव्हायरस रुग्णांची दैनिक सरासरी 1.30 टक्के आहे आणि साप्ताहिक दर 1.47 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या देशात असे 32 जिल्हे आहेत, जिथे सध्या कोरोनाचा पॉझिटिव्ह दर 10 टक्क्यां पेक्षा जास्त आहे. कोरोनाने या 6 राज्यांची स्थिती चिंताजनक आहे. यावर्षी या राज्यांमध्ये 3 मार्च ते 23 मार्चमधील फरक स्पष्टपणे दिसून येत आहे.  


या राज्यांमध्ये परिस्थिती बिघडत चालली आहे


3 मार्च रोजी महाराष्ट्रातील कोरोनाव्हायरस व्हेरिएंटचा पॉझिटिव्ह रेट 0.54 टक्के होता, जो 23 मार्च रोजी वाढून 4.58 टक्के झाला. दिल्लीत, कोरोनाव्हायरसचा साप्ताहिक सरासरी दर 0.53 टक्क्यांवरुन 4.53 पर्यंत वाढला आहे आणि गुजरातमध्ये, साप्ताहिक सकारात्मकता दर 0.07 टक्क्यांवरुन 2.17 टक्क्यांपर्यंत वाढला. याच कालावधीत केरळमधील सकारात्मकता दर 1.47 टक्क्यांवरुन 4.51 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तर कर्नाटकात ते 1.65 टक्क्यांवरुन 3.05 टक्के आणि हिमाचल प्रदेशात 1.92 टक्क्यांवरुन 7.48 टक्के झाला आहे. यावरुन असे स्पष्ट होत आहे की, रुग्णवाढ झपाट्याने होत आहे. 


10 -11 एप्रिल रोजी मॉक ड्रिल  


कोरोनाने टेन्शन वाढविल्याने खबरदारी घेण्यात येणार आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता 10 आणि 11 एप्रिल रोजी सर्व राज्यांमध्ये कोरोनाच्या तयारीबाबत मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. या संदर्भात सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्यावतीने राज्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. अलिकडेच एक बैठक झाली त्यावेळी चिंता व्यक्त करण्यात आली होती. सध्या जगातील रोजची नवीन रुग्ण पाहिल्यास भारत सातव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.